घरमहाराष्ट्रVarsha Gaikwad on CM Shinde : "विरोधकांना निधी मिळत नाही", वर्षा गायकवाड...

Varsha Gaikwad on CM Shinde : “विरोधकांना निधी मिळत नाही”, वर्षा गायकवाड यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

Subscribe

महालक्ष्मी रेस कोर्सच्या पुनर्विकासाला आमचा कायम विरोध राहिल आणि वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

मुंबई : राज्यात सत्ताधाऱ्यांना निधी मिळतो, पण विरोधकांना मिळत नाही. ही माहिती आरटीआयच्या माध्यमातून उघड झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चुकीचा पायंडा पाडत आहेत, असा आरोप काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. महालक्ष्मी रेस कोर्सच्या पुनर्विकासाला आमचा कायम विरोध राहिल आणि वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

निधी वाटपासंदर्भात वर्षा गायकवाड म्हणाल्या, “तुमच्या पक्षाला निधी द्यायचा आणि जे काऊन्सिलर माझ्या वॉर्डातील होते. पण आता ते शिंदे गटात गेले आणि अनेकांना कोटींचा निधी मिळाला. जे स्थानिक आमदार आहेत, त्यांना निधी मिळत नाही. आमच्या येथे डीपीडीसीचा निधी मुख्यमंत्री शिंदेमुळे मिळालेल्या नाही. सरकारच्या विरोधामुळे आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, अशा इशाराही वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पंतप्रधान मोदींची वीज बील शुन्यावर आणण्याची नवी योजना; कुठे, कसा आणि कोण करु शकणार अर्ज?

पालकमंत्र्यांनी निधी वाटपाचा अधिकार कोणी दिला

मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना निधी वाटप करण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला आहे. यात गैरव्यवहार झाला असून विरोधी आमदारांना जर निधी मिळाला नसेल, तर यासाठी मोठी जबाबदारी दिली, याची चौकशीर झाली पाहिजे, अशी मागणीही वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maratha Vs OBC : छगन भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा; शिंदे गटातील दोन आमदारांची मागणी

महालक्ष्मी रेस कोर्ससाठी रस्त्यावर उतरू

महालक्ष्मी रेस कोर्सची जागाही सरकारी जागा असून जनतेच्या हिसासाठी राखीव ठेवली आहे. पण सरकार ही जागा त्यांच्या मित्रांच्या घशात घालत आहे. महालक्ष्मी रेस कोर्सच्या पुनर्विकासाला आमचा विरोध कायम असेल आणि गरज वाटली तर आम्ही रस्त्यावर उतरण्याचा इशाराही वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -