घरताज्या घडामोडीकोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाबाबत निर्णय घेणार - वर्षा गायकवाड

कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाबाबत निर्णय घेणार – वर्षा गायकवाड

Subscribe

दहावी, बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबत पडताळणी सुरु

कोरोना संकटामुळे ज्या विद्यार्थ्यानी दोन्ही पालक गमावले आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाबाबत राज्य सरकार निर्णय घेणार आहे. अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या खर्चाबाबत प्रस्ताव राज्य सरकारसमोर ठेवण्यात आला आहे. यामधअये पहिली ते १२वी पर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनाकडून करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावाबाबत सकारात्मकता दाखवली असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार असल्यामुळे पुन्हा शाळा बंद राहण्याची शक्यता असल्याचेही संकेत वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

राज्यात कोरोनाच्या संसर्गाने हाहाकार घातला होता. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपलो दोन्ही पालक गमावले आहेत. अशा विद्यार्थ्यांची पहिली ते बारावीपर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनाकडून करण्यात येणार आहे. सर्व माहिती घेऊन प्रस्ताव राज्य सरकारसमोर ठेवण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागाला या निर्णयासाठी लागणाऱ्या निधीसह प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहेत. राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

- Advertisement -

दहावी, बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबत चाचपणी

राज्यातील ज्या भागांत कोरोना आटोक्यात आला आहे. तसेच कोरोनामुक्त जिल्ह्यांत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु करता येऊ शकतात का? याबाबत चाचपणी सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनामुक्त भागाची पाहणी करुन दहावी आणि बारावीचे वर्ग घेता येतील का याबाबत पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु कोरोनामुक्त गावात कोरोनाचा शिरकाव होणार नाही याची खात्री देणाऱ्या हे वर्ग सुरु करण्याची आवश्यकता असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. कोरोनाची तिसऱ्या लाटेविषयी तज्ञांचं मत ठाम आहे. कोरोनाची तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. शालेय फीबाबत शासनाने जीआर काढला आहे. जर कोणत्या शाळेकडून तक्रार आली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -