माझ्याकडे आलिशान गाड्या पण त्यामध्ये बसण्यासाठी वाघासारखा बाप नाही, वसंत मोरेंची भावूक पोस्ट

आज माझ्याकडे Audi ,BMW, इनोव्हा , harley Davidson आहे पण त्यामध्ये बसण्यासाठी मला त्या सायकलवर घेऊन फिरणारा वाघासारखा माझा बाप आज नाही. अशी भावना वसंत मोरे यांनी व्यक्त केली आहे.

Vasant More emotional post I have luxury cars but Not father sit in them
माझ्याकडे आलिशान गाड्या पण त्यामध्ये बसण्यासाठी वाघासारखा बाप नाही, वसंत मोरेंची भावूक पोस्ट

पुण्यातील मनसेचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे वसंत मोरे नेहमी आपल्या कामामुळे चर्चेत असतात. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन केलेलं आंदोलन असो नाहीतर कोरोना काळात रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नसल्यामुळे अधिकाऱ्यांच्या गाडीची केलेली तोडफोड असेल, वसंत मोरे नेहमी सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी धावून जातात. परंतु आज वसंत मोरे यांची वेगळ्या कारणामुळे चर्चा होत आहे. माझ्याकडे महागडया आणि आलिशान गाड्या आहेत परंतु त्यामध्ये बसण्यासाठी सायकलवर घेऊन फिरणारा माझा बाप नाही असे म्हणत वसंत मोरेंनी एक भावूक पोस्ट केली आहे. आठवण म्हणून वडिलांची सायकल आणि कुऱ्हाडीचा फोटो मोरेंनी शेअर केला आहे.

पुण्यातील मनेसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी ट्विट करत आपल्या वडिलांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. नेहमी आक्रमक शैलीत असणाऱ्या वसंत मोरेंनी भावूक पोस्ट केली आहे. या ट्विटची सर्वत्र चर्चा होत असून चाहत्यांनी पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या वडिलांसोबतच्या आठवणी वसंत मोरेंनी जपून ठेवल्या आहेत.

मनसे नेते वसंत मोरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, या सायकलच्या मागील कॅरिअरवर अनेक दिवस रात्री, अनेक वर्षे बसून फिरलोय. ही सायकल कमीत कमी ३० वर्षांपूर्वीची आहे. कुऱ्हाडही अजून तीच आहे. सगळी प्रॉपर्टी विकली तरी हिची सर येणार नाही. कारण जेव्हा गमावण्यासारखे जवळ काहीच नव्हते तेव्हा फक्त हीच होती असे वसंत मोरे म्हणाले आहेत.

माझ्याकडे ऑडी, बीएमडब्लू गाडी पण बाप…

दरम्यान वसंत मोरे पुढे म्हणाले की, भले आज माझ्याकडे Audi ,BMW, इनोव्हा , harley Davidson आहे पण त्यामध्ये बसण्यासाठी मला त्या सायकलवर घेऊन फिरणारा वाघासारखा माझा बाप आज नाही. म्हणून ही सायकल मी अजून जपून ठेवली आहे. आशा आशयाचे ट्विट वसंत मोरे यांनी केले असून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. वसंत मोरे आपल्या वडिलांच्या आठवणी शेअर करताना कमालीचे भावूक झाले असल्याचे दिसत आहे.


हेही वाचा : अनिल परब यांची ईडीकडून १३ तास चौकशी, ७ ठिकाणी छापेमारी