मनसे भोंगा आंदोलन : वसंत मोरे कालपासून नॉटरिचेबल

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसाबाबत गुढीपाडव्याच्या सभेत भूमिका जाहीर केल्यानंतर याबाबत वेगळा सूर वसंत मोरे यांच्या रुपाने उमटला होता. त्यावेळी मनसेचे शहराध्यक्ष असलेल्या वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या भूमकेमुळे आपली अडचण होत असल्याचे म्हटले होते.

vasant more is not participated inloudspeaker agitation
vasant more is not participated inloudspeaker agitation

पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यानंतर रात्रीपासून राज्यभरात तगडा पोलीस बंदोबस्त असून अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु आहे. मात्र, यात मनसे नेते वसंत मोरे कुठेच सक्रिय दिसत नाहीत. ते कालपासून नॉटरिचेबल झाले आहेत.

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसाबाबत गुढीपाडव्याच्या सभेत भूमिका जाहीर केल्यानंतर याबाबत वेगळा सूर वसंत मोरे यांच्या रुपाने उमटला होता. त्यावेळी मनसेचे शहराध्यक्ष असलेल्या वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या भूमकेमुळे आपली अडचण होत असल्याचे म्हटले होते. यानंतर त्यांना शहराध्यक्ष पदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर वसंत मोरेंची नाराजी दूर करण्याचा दावा मनसेकडून करण्यात आला. मात्र, आजच्या भोंगे आंदोलनात वसंत मोरे मात्र कुठेच सक्रिय दिसत नाहीत. कालपासून ते नॉट रिचेबल आहेत.

पुणे शहराध्यक्षपदावरुन पायउतार झाल्यानंतर वसंत मोरे इतर पक्षात जाणार अशी चर्चा रंगली होती. यावेळी वसंत मोरे यांनीही आपल्याला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपकडून ऑफर असल्याचा दावा केला होता. परंतु मनसे सोडून जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.