घरमहाराष्ट्रपुणेVasant More: एकदा ठरलं की ठरलं...; वसंत मोरेंच्या WhatsApp Status ची जोरदार...

Vasant More: एकदा ठरलं की ठरलं…; वसंत मोरेंच्या WhatsApp Status ची जोरदार चर्चा

Subscribe

पुणे: वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देऊन आता जवळपास दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. या दहा दिवसांमध्ये वसंत मोरे यांनी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठी तिकीट मिळेल, अशी त्यांना आशा होती. मात्र पुण्यातून काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना उमेदवारी दिल्याने, वसंत मोरे यांनी आता व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Vasant More Once decided decided Vasant More s WhatsApp Status is heavily discussed)

व्हॉट्सअॅप स्टेटस काय?

वसंत मोरे यांनी व्हॉट्सअॅपला एकदा ठरलं की ठरलं असं कॅप्शन देत स्वत: चा फोटो स्टेटसला ठेवला आहे. वसंत मोरे यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. परंतु गुरुवारी रात्री काँग्रेसने आपली तिसरी उमेदवार यादी जाहीर करत पुण्यातून कसबा पेठेचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना संधी दिली आहे. त्यामुळे मोरेंची निराशा झाली. त्यानंतर त्यांनी व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे पुण्यात आता चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

वसंत मोरेंची फेसबूक पोस्टही व्हायरल

वसंत मोरे लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. मी लोकसभा निवडणूक लढवणार आहे. पुण्याची निवडणूक एकतर्फी होणार नाही. मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चावा घेऊ शकते. अनेक मुद्दे घेऊन मी पुणेकरांसमोर जाणार आहे. सभेतून मुद्दे मांडणार आहे. मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर अनेक भाजपा नेते बोलले की निवडणूक एकतर्फी करू.. पण पुणेकर कधीच कोणाला एकर्फी निवडून देत नाहीत, असं वसंत मोरे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मोरे लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असून विविध नेते मंडळींच्या भेटीगाठी घेत त्यांनी पर्यायांची चाचपणी सुरू केल्याचं पाहायला मिळालं. वसंत मोरे यांनी शरद पवार, संजय राऊत आदी नेत्यांची भेट घेऊन पुण्यातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु ही जागा काँग्रेसच लढवणार असल्याचे आणि मोरे यांना काँग्रेसकडून संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने मोरे यांनी एकला चालो रे… ची भूमिका घेतली आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: BMC FD : पालिकेच्या ठेवींवर शिंदे सरकारकडून दरोडा; MMRDA ला 1000 कोटी देण्यावरुन आदित्य ठाकरे भडकले)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -