घरताज्या घडामोडीमला आता ठाम भूमिका घ्यावीच लागेल, बॅनरच्या वादावरून वसंत मोरेंचा नाराजीचा सूर

मला आता ठाम भूमिका घ्यावीच लागेल, बॅनरच्या वादावरून वसंत मोरेंचा नाराजीचा सूर

Subscribe

मनसे सरचिटणीस वसंत मोरे यांच्या नाराजीची चर्चा मागील अनेक दिवसांपासून पुण्यात रंगत आहे. पक्षांतर्गत राजकारणाचा दाखला देऊन थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत वसंत मोरे यांनी तक्रार पोहोचवली होती. परंतु कसब्यातील एका बॅनरवरून पुन्हा एकदा वसंत मोर यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटला असून मनसे गटात अंतर्गत वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वसंत मोरेंनी कसब्यात लावलेल्या बॅनरवरून आक्षेप नोंदवला आहे. कसबा पेठ भागात मनसेकडून रामनवमीच्या निमित्तानं महाआरतीचं आयोजन करण्यात आलं. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र, या आरतीसाठी छापण्यात आलेल्या बॅनरवर मनसे सरचिटणीस वसंत मोरेंचं नाव किंवा फोटोही छापला नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावेळी वसंत मोरेंनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना बॅनरबाबत सविस्तर भूमिका मांडली.

- Advertisement -

काय म्हणाले वसंत मोरे?

मला एका मित्राने त्या बॅनरचा फोटो पाठवला होता. त्यात कोअर कमिटीतल्या ११ लोकांपैकी ९ लोकांची नावं आहेत. मला विशेष याचं वाटलं की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कसब्यातले आरएसएसचे कार्यकर्ते प्रशांत यादव यांच्या उपस्थितीत ही आरती होणार आहे. त्यांचही बॅनरवर नाव आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माणसाचं नाव जर त्या बॅनरवर असेल, तर मग मनसे सरचिटणीस वसंत मोरेचं नाव त्या बॅनरवर का नसावं?, असा प्रश्न वसंत मोरे यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

मला तरी वाटतं की हे जाणून-बुजून केलं जात आहे. कुठेतरी वाद निर्माण करायचा. माझं नाव टाकायचं नाही. एखाद्याला वाटतं की आपण सूर्यावर झाकण टाकू. झाकल्यानं कोंबडं आरवायचं राहातं का? दिवस उगवतोच ना?, असं वसंत मोरे म्हणाले.

यांना बरेच दिवस काही नसेल तर या गोष्टी कराव्या लागतात. पण मलाही या गोष्टींचा राग येतोय. जर या लोकांना एवढा माझा त्रास होत असेल, तर मलाही काहीतरी ठाम भूमिका घ्यावी लागेल. राज ठाकरेंशी मला या गोष्टी बोलाव्या लागतील, असंही मोरे म्हणाले.


हेही वाचा : मोदी-अदानी संबंधांवर काॅंग्रेस आक्रमक; 31 मार्चला राज्यभर घेणार पत्रकार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -