Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र Vasant Panchami 2021: पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचा शाही विवाहसोहळा संपन्न

Vasant Panchami 2021: पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचा शाही विवाहसोहळा संपन्न

Related Story

- Advertisement -

आजपर्यंत तुम्ही अनेक विवाह सोहळे पाहिले असतील मात्र तुम्ही देवाचा विवाह पाहिलाय का.. असाच एक विवाह सोहळा पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विवाह संपन्न झाला तोही शाही पद्धतीने. मंगल अक्षता, सनई चौघडे आणि उपस्थित वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत हा विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडला.

मूर्तरूपासह फुलांच्या सजावटीतून देवही आवतरले

हा विठुरायाच्या विवाहाचा सोहळा वसंत पंचमी या दिवशी होतो, ही शेकडो वर्षांपासून परंपरा असून या साक्षात परब्रह्म पांडुरंग आणि जगन्माता रुक्मिणीचा विवाहसोहळ्यास मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावत असतात. मात्र यंदा राज्यात कोरोनाच्या सावटामुळे भाविकांची रीघ जरी कमी असली तरी फुलांनी केलेल्या सजावटीतून प्रत्यक्षात देवच स्वर्गातून आल्याचे दिसले. यावेळी पार पडलेला विवाह सोहळा खास असून या विवाहसोहळ्यासाठी साक्षात ब्रह्मदेव सरस्वती, शंकर पार्वती , विष्णू महालक्ष्मी, बालाजी पद्मावती, राधा कृष्ण या जोड्यांसह गणपती, नारदमुनी यासारखे स्वर्गातील देवही उपस्थित होते. ही संकल्पना पुण्यातील फुल सजावटीची सेवा देणारे भारत भुजबळ हे मूर्तरूपात आणि फुलांच्या सजावटीतून साकारली.

असा होता पोशाख

- Advertisement -

वसंतपंचमी ते रंगपंचमी या काळात देवाला व रुक्मिणीमातेला पांढरे कपडे वापरण्याची परंपरा असल्याने देवासाठी खास पांढऱ्या रंगाची अंगी व उपरणे बनवण्यात आले. यावर विष्णूच्या शुभ खुणा असलेला शंख, चक्र व ओम विविध प्रकारच्या रंगीबेरंगी मोत्याच्या बनविण्यात आले होता. रुक्मिणीलाही अतिशय उंची सिल्कची कांजीवरम साडी निवडण्यात आली. तसेच दरवर्षी देवाचा पोशाख खास असला तरी यंदा तो फॅशन डिझायनरने बनवून अर्पण केल्याने पहिल्यांदाच देवाला असा खास बनविलेला पोशाख विवाहात घातलेला दिसला.

विवाह पार पडला त्या विठ्ठलसभा मंडपाला दरबाराचे स्वरूप देण्यात आले होते. या विवाहसोहळ्याला स्वर्गातील देव उपस्थित असल्याचा फुलांचा देखावा करण्यात आला होता. मंदिराच्या महाद्वार अर्थात नामदेव पायरीला देखील विवाह वाद्यांची आकर्षक सजावटीचे काम करण्यात आले आहे. विठ्ठल व रुक्मिणी गाभारा देखील अतिशय आकर्षकरीतीने सजवण्यात आला असून या सजावटीसाठी तब्बल ६० कारागीर झटत असून यासाठी ॲंथोरियम, विविध रंगी गुलाब, ओर्केड जरबेरा, मोगऱ्यासह ३६ प्रकारच्या ५ टन फुलांचा वापर करण्यात येत आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -