घरताज्या घडामोडीVBA Lok Sabha Candidates : अखेर वसंत मोरेंच्या गळ्यात वंचितकडून पडली उमेदवारीची...

VBA Lok Sabha Candidates : अखेर वसंत मोरेंच्या गळ्यात वंचितकडून पडली उमेदवारीची माळ

Subscribe

लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यंदाच्या लोकसभेत राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत असणार आहे. विशेष म्हणजे यंदाची लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढवत आहे.

मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यंदाच्या लोकसभेत राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत असणार आहे. विशेष म्हणजे यंदाची लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढवत आहे. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत तीन उमेदवारांच्या याद्या वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडलेल्या वसंत मोरे उर्फ तात्या यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवाय आतापर्यंत 24 उमेदवार जाहीर केले आहेत. (VBA Lok Sabha Candidates Vasant More finally got the nod of candidacy Total 24 candidates declared)

केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. आतापर्यंत अनेक उमेदवारी जाहीर करत यंदाची निवडणूक काटे की टक्कर करण्याच्या तयारीत मविआ आहे. यापार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी देखील महाविकास आघाडीत सामील होती. महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला पाच जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. या पाच जागा शिवसेनेच्या गोठातील होत्या. कारण महाविकास आघाडीत वंचितने शिवसेना ठाकरे गटाशी युती केली होती. परंतू, जागावाटपात योग्य मान न मिळाल्याने अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वेगळा मार्ग निवडत यंदाची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

एकिकडे वंचित बहुजन आघाडी लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करत असली तरी, दुसरीकडे महाविकास आघाडीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अनेक उमेदवारांना त्यांना पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानुसार, त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, याआधी कोल्हापूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांनाही पाठिंबा देण्याचा निर्णय वंचितने घेतला.

वंचितने आतापर्यंत 24 उमेदवार जाहीर

1. प्रकाश आंबेडकर – अकोला
2. संजय केवात – भंडारा गोंदिया
3. प्राजक्ता पिल्लेवान – अमरावती
4. राजेश बेले – चंद्रपूर
5. वसंत मगर – बुलढाणा
6. हितेश मांडावी – गडचिरोली
7. राजेंद्र साळुंके – वर्धा
8. सुभाष पवार – यवतमाळ-वाशीम
9. डॉ. बी डी चव्हाण – हिंगोली
10. नरसिंहराव उदगिरकर – लातूर
11. राहुल गायकवाड – सोलापूर
12. रमेश बारसकर – माढा
13. मारुती जानकर – सातारा
14. अब्दुल रेहमान – धुळे
15. दादासाहेब पाटील – हातकणंगले
16. संजय ब्राम्हणे – रावेर
17. प्रभाकर बकले – जालना
18. अबुल हसन खान – मुंबई उत्तर मध्य
19. काका जोशी – रत्नागिरी-सिंधुदुर्ग
20. अविनाश बोसिकर – नांदेड
21. बाबासाहेब उगले – परभणी
22. अफसर खान – संभाजीनगर
23. वसंत मोरे – पुणे
24. मंगलदास बागुल – शिरूर

- Advertisement -

हेही वाचा – BREAKING NEWS : वंचितकडून वसंत मोरे यांना पुण्यातून उमेदवारी, तिसऱ्या यादीतून घोषणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -