घरमहाराष्ट्रVBA : गडकरींचा पराभव होणार असल्याने नाना पटोले दुःखी; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक...

VBA : गडकरींचा पराभव होणार असल्याने नाना पटोले दुःखी; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप

Subscribe

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत एकला चलो रे चा नारा दिला. यानंतर त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत किती खोट बोलाल असे म्हणत निशाणा साधला होता. यानंतर आता त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. नाना पटोले यांचे भाजपामधील काही नेत्यांसोबत छुपे संबंध आहेत. त्यामुळे त्यांना भाजपाविरोधात लढायचे नाही, असा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते अकोल्यात आज संध्याकाळी पत्रकार परिषदेत बोलत होते. (VBA Nana Patole sad as Nitin Gadkari will be defeated Sensational allegation of Prakash Ambedkar)

हेही वाचा – Shinde VS Satpute : पुलवामा हल्ल्यावरून प्रणिती शिंदेंचा भाजपावर आरोप; राम सातपुतेंचे जोरदार प्रत्युत्तर

- Advertisement -

नाना पटोले यांनी नितीन गडकरींना पाडण्यासाठी वंचितने पाठिंबा दिल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सात जागेच्या पाठिंब्याचे पत्र आम्ही काँग्रेसला दिले. त्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी कोल्हापूर आणि नागपूरला पाठिंबा देण्याचे कळवल्यावर आम्ही दोन्ही ठिकाणी पाठिंबा जाहीर केला. या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार जिंकणार म्हणून नाना पटोले यांना प्रचंड दु:ख झाले आहे. त्यामुळे वंचितने गडकरींना हरवण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

नाना पटोले यांचे भाजपाच्या काही नेत्यांसोबतचे छुपे संबंध उघड झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष असूनही आपला उमेदवार जिंकण्यापेक्षा गडकरी हरतील, याचे दु:ख त्यांना झाले. त्यामुळे आम्ही देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून पाठिंबा दिल्याचा खोटा आरोप ते करीत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये अध्यक्षांवर किती विश्वास आहे, हे दिसून आले. वरिष्ठांनी आम्हाला थेट कळवले व आम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे पाठिंबा जाहीर केला. त्याचे दु:ख पटोलेंना झाले म्हणून ते आता वंचितवर टीका करीत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Vijay Shivtare : अजित पवारांचा ब्रह्मराक्षस उल्लेख करत कार्यकर्त्याचं माघार घेणाऱ्या शिवतारेंना खरमरीत पत्र

काँग्रेसने नाना पटोले यांना भंडारा-गोदिंयातून निवडणूक लढण्यासाठी सांगितल्यावर त्यांनी माघार का घेतली? त्याचे खरे कारण आज कळले. त्यांना भाजपविरोधात लढायचे नाही. त्यांचे आणि भाजपाचे नाते चव्हाट्यावर आले आहेत, ही गोष्ट सर्वसामान्यांनी लक्षात घ्यावी. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये गेली असती तर भाजपाचे अनेक नेते हरले असते. ही गोष्ट नाना पटोलेंना नको होती, म्हणून त्यांनी वंचितचा ‘मविआ’मध्ये समावेश होऊ दिला नाही. नांदेड येथील काँग्रेसचा उमेदवार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त नाही. नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांच्या सांगण्यावरून उमेदवार दिला, असा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -