घरमहाराष्ट्रहर घर तिरंगा अभियानातून राष्ट्रीयता वाढविण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

हर घर तिरंगा अभियानातून राष्ट्रीयता वाढविण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

Subscribe

मुंबई : भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्या वतीने देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येकामध्ये राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारला दिले.

- Advertisement -

आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या नियोजना संदर्भात केद्रींय सांस्कृतिक विभागाने व्हीसीद्वारे घेतलेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी हे अभियान राबविण्याबाबत महाराष्ट्रातील तयारीबद्दल माहिती दिली. राज्यात हे अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. जास्तीत जास्त घरांवर तिरंगा फडविण्यात येईल, अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांची आठवण ठेवत असताना येणाऱ्या काळात भारताला आणि महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय सांस्कृतिकमंत्री किशन रेड्डी उपस्थित होते.

येत्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान संपूर्ण राज्यभरात ‘हर घर तिरंगा’ हे अभियान मोठ्या उत्साहात आणि आनंदात राबविण्यात येणार आहे. यात राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. यासोबत राज्यातील सर्वच प्रमुख सरकारी इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात येईल; तसेच केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील शहरी व ग्रामीण भागांतील जास्तीत जास्त घरांमध्ये तिरंगा फडकवण्यात यावा, यासाठी बहुसंख्येने झेंडे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येतील. तसेच राज्यातील शेतकरी, महिला, शाळकरी मुले याबरोरबच स्वयंसेवी संस्था, वेगवेगळया सहकारी संस्था या सर्वांना यात सहभागी केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बगेल, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, नागालँडचे मुख्यमंत्री नैफीयू रीओ, आसामचे मुख्यमंत्री हिमानता बिस्वा सर्मा यांनी यावेळी आपल्या सूचना मांडल्या.

या बैठकीसाठी मंत्रालयातून मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्रयाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय उपस्थित होते.

हेही वाचा – सोमवारपासून ‘या’ वस्तूंच्या किमतीत होणार वाढ; सर्वसामान्यांना बसणार आर्थिक फटका

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -