शरद पवारांना नारायण राणेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, ‘समर्थ आहोत आम्ही…’

वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे विरोधकांनी भाजपावर टीका करायला सुरुवात केली आहे. नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.

वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे विरोधकांनी भाजपावर टीका करायला सुरुवात केली आहे. नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. ‘आम्ही सत्तेत असताना मला मंत्रालयात रोज देशातल्या आणि देशाबाहेरच्या गुंतवणूकदारांशी बोलण्यासाठी वेळ काढायला लागायचा. आता वाद थांबवूया’, असे शरद पवार यांनी म्हटले होते. त्याच्या या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे. (Vedanta Foxconn Bjp Narayan Rane Targets Ncp Sharad Pawar Shivsena Uddhav Thackeray)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते. शिंदे सरकार स्थापन होऊन दोन महिन्याचा कालावधी झाला आहे. या प्रकल्पाचे काम गेल्या अनके दिवसांपासून सुरु होते. पण राज्यात तिघाडी सरकार असल्यामुळे तडजोड झाली नाही आणि प्रकल्प इतरत्र गेल्याचे ते म्हणाले आहेत.

“अडीच वर्षांत शरद पवारांच्या तीन पक्षांच्या राजवटीत उद्योगाला पोषक वातावरण नव्हते, म्हणून इथून उद्योग गेले आहेत. आता उद्योग गेल्यानंतर हात चोळत बसण्यात अर्थ नाही. आम्ही बघू आता. समर्थ आहोत आम्ही. सत्तेवर व्यवस्थित बसू तर द्या. बसायच्या आधीच ते दोन तासांचा अनुभव सांगतात. चार वेळा ते मुख्यमंत्री होते. त्यानंतर महाराष्ट्रात औद्योगिक क्रांती झाली असती. का झाली नाही? अडीच वर्षांत तशी का दिसली नाही? अडीच वर्षं त्यांचे मुख्यमंत्री मातोश्रीवर का बसले होते? उगाच आता बढाया मारू नका. गप्प बसा, आम्ही समर्थ आहोत राज्य सांभाळायला आणि औद्योगिक प्रगती करायला”, असे नारायण राणे यांनी म्हटले.

“विरोधकांना कामधंदा काय आहे? विरोधकांनी आयुष्यात काय केले? अडीच वर्ष मातोश्रीवर राहून सरकार चालवले. सगळ्या तडजोडीच केल्या आहेत. तडजोडीमुळेच हे उद्योग गेले आहेत. वैयक्तिक फायद्यासाठी केलेल्या तडजोडीमुळे उद्योग गेले आहेत”, असेही नारायण राणे यांनी म्हटले.


हेही वाचा – मुंबईत नेत्रविकारांसाठी विशेष रुग्णालय करावे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश