घरताज्या घडामोडीमहाराष्ट्राच्या मुख्य पोस्टमास्टर जनरलचा वीणा आर. श्रीनिवास यांनी पदभार स्वीकारला

महाराष्ट्राच्या मुख्य पोस्टमास्टर जनरलचा वीणा आर. श्रीनिवास यांनी पदभार स्वीकारला

Subscribe

१९९१च्या बॅचच्या भारतीय टपाल सेवा अधिकारी वीणा आर. श्रीनिवास यांनी महाराष्ट्राच्या मुख्यम पोस्टमास्टर जनरलचा पदभार स्वीकारला आहे. काल, बुधवारी (८ नोव्हेंबर २०२१) उच्च प्रशासकीय श्रेणीत पदोन्नती झाल्यामुळे मुख्य पोस्टमास्टर जनरल महाराष्ट्र सर्कल म्हणून वीणा आर. श्रीनिवास रुजू झाल्या. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सशी संलग्न असलेल्या गोकुळ इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे येथून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त
केली आहे. तसेच त्यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात एमए केले असून कायद्याची पदवीही घेतली आहे.

श्रीनिवास या प्रथम पोस्ट विभागात वरिष्ठ अधीक्षक रेल्वे मेल सर्व्हिस पुणे म्हणून रुजू झाल्या. त्यानंतर पोस्ट ऑफिसचे वरिष्ठ अधीक्षक, व्यवस्थापक ऑटोमॅटिक मेल प्रोसेसिंग सेंटर, मुंबई, उपविभागीय व्यवस्थापक, पोस्टल लाइफ इन्शुरन्स, मुंबई म्हणून त्यांनी विविध पदांवर काम केले. कनिष्ठ प्रशासकीय दर्जाच्या पदोन्नतीवर त्यांनी निदेशक पोस्टल सर्व्हिस कानपूर म्हणून काम केले. शिवाय वीणा यांनी २००२-२००४ पर्यंत आशियातील सर्वात मोठे पोस्ट ऑफिस मुंबई GPO चे संचालक म्हणून काम करण्याची जबाबदारी पार पाडली.

- Advertisement -

२००४ ते २००९ या कालावधीत त्यांनी अणुऊर्जा विभागात उपसचिव आणि मुख्य दक्षता अधिकारी मरमुगोवा पोर्ट ट्रस्ट म्हणून प्रतिनियुक्तीवर काम केले आहे. तसेच त्यांनी डिसेंबर २००९ ते जानेवारी २०१३ या कालावधीत निदेशक पोस्टल सर्व्हिसेस, गोवा आणि निदेशक, विदेश डाक भवन, मुंबई म्हणून काम केले आहे. वरिष्ठ प्रशासकीय श्रेणीतील पदोन्नतीवर, त्यांनी पोस्टमास्टर जनरल (मेल आणि व्यवसाय विकास) म्हणून बंगळुरू, पोस्टमास्टर जनरल, उत्तर कर्नाटक प्रदेश, धारवाड येथे २०१७ ते जून २०२१पर्यंत आणि पोस्टमास्टर जनरल (मेल आणि व्यवसाय विकास),चेन्नई येथे, मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल या पदावर पदोन्नती होईपर्यंत काम केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -