घरमहाराष्ट्रVeer Savarkar : देवही बदलले का? चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न

Veer Savarkar : देवही बदलले का? चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न

Subscribe

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून पुन्हा एकदा काँग्रेस आणि भाजपा आमने-सामने आले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मुलाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटू लागले आहेत. याविरोधात भाजपा उद्या, शुक्रवारी राज्यभरात तीव्र आंदोलन करणार आहे. त्याचबरोबर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी याप्रकरणावरून काँग्रेसवर टीका करतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – Criticism Of Veer Savarkar: कर्नाटकात उफाळला ‘सावरकर’ वाद; खर्गेंचे वक्तव्य कारणीभूत

- Advertisement -

काँग्रेसी काजवे कितीही बडबडले तरी, सावरकर नावाच्या स्वातंत्र्यसूर्याचे तेज अखंड तळपत राहील. सावरकरी हिंदुत्वाच्या दुधारी तलवारीचा धाक असल्याने निवडणुकीपुरते का होईना, काँग्रेसवाले हिंदू देवी-देवतांच्या दर्शनाचे नाटक करतात. मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांक खर्गे यांनी स्वत:ला आरशात पहावे, स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची उंची मोजावी आणि मग सावरकर यांच्या उत्तुंगपणाला हात घालण्याची माकडचेष्टा करावी, अशी तीखट प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे.

- Advertisement -

सावरकर यांना हिंदुत्वाचे दैवत मानणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी या अपमानावर आपली मान वर करून किमान काँग्रेसवाल्यांवर डोळे तरी वटारावेत; की, इंडि आघाडीसोबतच्या नव्या संसारात तुम्ही देवही बदलले आहेत? असा बोचरा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.

काय म्हणाले प्रियांक खर्गे

कर्नाटकचे माहिती आणि प्रसारणमंत्री प्रियांक खर्गे यांनी वीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. आपण विधानसभेचे अध्यक्ष असतो तर बेळगाव येथील सुवर्णसौध या विधानसभेतून वीर सावरकर यांचा फोटो काढून टाकला असता, असे सांगून, सावरकर यांचे योगदान काय? सावरकर यांना वीर ही पदवी कशी मिळाली हे भाजपाने सांगावे? असे आवाहन त्यांनी दिले. ज्यांची विचारधारा द्वेष आणि फूट पाडत असेल तर त्यांचा फोटो नको. म्हणून सावरकर यांचे चित्र विधानसभेत नसावे, असे माझे मत आहे. आता हे पक्षाचे मत आहे की नाही, ते मला माहीत नाही, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – BJP Vs Congress : खर्गे पुत्राच्या वक्तव्याचे पडसाद, शुक्रवारी भाजपा करणार राज्यव्यापी आंदोलन

महाराष्ट्रात भाजपाकडून आंदोलन

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांच्याविरोधात महाराष्ट्र भाजपाच्या वतीने उद्या, शुक्रवारी राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान आम्ही सहन करणार नाही. भाजपाचे सर्व कार्यकर्ते राज्यभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी जाहीर केले आहे.

हेही वाचा – Mahua Moitra : महुआ मोईत्रा यांच्यावर कारवाई होणार? BJP खासदारांना लोकसभेत हजर राहण्याचे आदेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -