घरताज्या घडामोडीCoronavirus: अरे बापरे, आता इंधनही मिळणार मर्यादित; वाचा किती रुपयाच मिळणार इंधन?

Coronavirus: अरे बापरे, आता इंधनही मिळणार मर्यादित; वाचा किती रुपयाच मिळणार इंधन?

Subscribe

करोनाच्या पार्श्वभूमीवर आता इंधनावर देखील निर्बंध घालण्यात आले आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यूची घोषणा केली. रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत कर्फ्यू असेल अशी घोषणा करण्यात आली. त्यानंतर कर्फ्यू सोमवारी सकाळी ५ वाजेपर्यंत वाढवण्यात आला. या कर्फ्यूला जनतेने उत्तम प्रतिसाद दिला. मात्र, सोमवारी सकाळी कर्फ्यू संपताच नागरिकांनी पुन्हा एकदा गर्दी करण्यास सुरुवात केली. नेहमीप्रमाणे आज रस्त्यावर वर्दळ दिसण्यास सुरुवात झाली. एकीकडे रस्ते, बसेस बंद करण्यात आले. मात्र, सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आल्याने लोकांनी आपल्या खासगी गाड्या घेऊन रस्त्यावर आले. त्यामुळे करोनाचा संसर्ग होण्याची भीती अधिक वाढू लागली. त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेत इंधनावर निर्बंध घातले आहेत.

किती रुपयाचे मिळणार इंधन

नागरिकांना सरकार आणि प्रशासनाकडून वारंवार आवाहन करुन देखील नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे आता नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी इंधनावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. दुचाकीस्वारांना १०० रुपयांचे पेट्रोल देण्यात येईल तर चारचाकी वाहनांना जास्तीत जास्त १ हजार रुपयाचे इंधन देण्यात येणार आहे.

- Advertisement -

सहा महिन्यांचा तुरुंगवास

नागरिकांनी आवश्यक नसताना घरा बाहेर पडू नये आणि करोनाचा संसर्ग वाढू नये, या हेतूने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे. मात्र, असे असताना अनेक वाहनचालक वेगवेगळ्या पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल, डिझेल घेऊन नियमांच उल्लंघन करतील. मात्र, अशा वाहन चालकांनावर करडी नजर ठेवली जाणार आहे. तसेच अशा व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी डिजिटल यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून नियम मोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कलम १८८ आणि १४४ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अशा व्यक्तींना सहा महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो.


हेही वाचा – Coronavirus: भाईंदरमध्ये क्वारंटाईन रुग्ण दोन तास भटकला

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -