घरCORONA UPDATECoronavirus : जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने चालकांच्या प्रतीक्षेत!

Coronavirus : जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने चालकांच्या प्रतीक्षेत!

Subscribe

पोलिसांकडून होणाऱ्या मालवाहतूक करणारी वाहने अडवली जात असल्याने वाहतूकदारांची समस्या वाढली आहे. 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडून नयेत, यासाठी  केंद्र शासनाने अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंसह सर्वच माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना रस्त्यावर धावण्यास परवानगी दिली आहे. मात्र, वाहनांवरील चालकच गावाकडे गेल्याने नेमकी वाहतूक करायची तरी कशी? ही नवी समस्या माल वाहतुकदारांसमोर उभी ठाकली आहे. तसेच पोलिसांकडून होणाऱ्या मालवाहतूक करणारी वाहने अडवली जात असल्याने वाहतूकदारांची समस्या वाढली आहे.

कोरोना विषाणू विरोधात संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद आहे. शहरासह ग्रामीण भागातील रस्ते सामसूम अन् निर्मनुष्य आहे. एसटी बस, प्रवासी वाहतूक गाड्यांसह देशभरातील रेल्वे सेवा बंद. अशा आपत्कालीन परिस्थितीत देशभरात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडून नयेत, यासाठी केंद्र शासनाने अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंसह सर्वच माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना रस्त्यावर धावण्यास परवानगी दिली आहे. तसेच अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहे. मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही आहे. माल वाहतुकदारांच्या देशव्यापी संघटनेच्या १५० प्रतिनिधींनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शनिवारी दुपारी तीन वाजता एकमेकांशी संवाद साधला. तसेच या संवादामध्ये माल वाहतुकदारांसमोर उद्भवणाऱ्या समस्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी शासन निर्णयाच्या अंमलबजावणीचा अभाव आणि मोठ्या प्रमाणात चालकांचा तुटवडा या मुद्द्यांवर संघटनेच्या प्रतिनिधींनी संवाद साधल्याचे बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या टास्क फोर्सचे अध्यक्ष अभिषेक गुप्ता यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

निर्णयाची अंमलबजावणी होत नाही 

जीवनावश्यक वस्तूची मालवाहतूक करणाऱ्या वाहने स्थानिक आरटीओ आणि पोलिसांकडून रोखली जात आहेत. चालकांना मारहाण होत आहे. त्यामुळे इतर वाहनांवरील चालकही काम करण्यास धजावत नाही. त्यामुळे केंद्र शासनासोबत राज्य शासनांकडेही शासन आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करण्याचे व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये निश्चित करण्यात आले. माल वाहतूक वाहनांअभावी अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यासाठीच केंद्र शासनाने चालकांच्या लायसन्स नुतनीकरण, फिटनेस सर्टिफिकेट अशा विविध कागदपत्रांच्या नुतनीकरणातून ३० जूनपर्यंत सूट देण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही.

संघटना करणार मदत 

लॉकडाऊनमुळे मोठ्या संख्येने चालक आपल्या गावाकडे गेले आहेत. आता सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने त्यांचे परतीचे मार्गही बंद झाले आहेत. त्यामुळे अनेक वाहतुकदारांची इच्छा असूनही अत्यावश्यक सेवा पुरवणारी माल वाहतूक वाहने जागीच उभी आहेत. त्यामुळे संबंधित चालकांना स्थानिक पोलीस ठाण्याद्वारे समन्वय साधत परतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी संघटना प्रयत्न करणार असल्याचे यावेळी ठरवण्यात आले, अशी माहिती गुप्ता यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -