घरउत्तर महाराष्ट्रसातपूरमध्ये मध्यरात्री वाहनांची तोडफोड

सातपूरमध्ये मध्यरात्री वाहनांची तोडफोड

Subscribe

ध्रुवनगर भागातील खंडोबा मंदिराजवळील परिसरातील टोळक्याने वाहनांवर दगड-विटा फेकून वाहनांच्या काचा फोडल्याची घटना सोमवारी (दि.४) मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. जुने नाशिक येथील वाहनांच्या तोडफोडीच्या घटनेनंतर पुन्हा ध्रुवनगर परिसरात तोडफोड झाल्याने टवाळखोर, गुन्हेगारी वृत्तीच्या टोळक्यांमुळे वाहनांच्या सुरक्षीततेचा व सार्वजनिक शांततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जुने नाशिकमधील चौक मंडई भागात शनिवारी (दि.२) रात्री दोन टोळक्यांमधील १५ ते २० जणांच्या जमावाने दहशत करण्यासाठी परिसरातील चारचाकी, दुचाकी व व्यावसायिक वाहनांची तोडफोड केली. त्यात वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले होते. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी पाच जणांना अटक केली. या घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांत दुसर्‍या टोळक्याने गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ध्रुवनगर परिसरात सोमवारी मध्यरात्री वाहनांची तोडफोड करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. टोळक्याने सुभाष जाधव यांच्या घरासमोरील स्विफ्ट कार (एमएच ०२ सीडब्लू ८९२२), गिरीश तिलनकर हुंडाई (एमएच ४१ व्ही ५२६१), अशोक काळे यांची स्कूल व्हॅन (एमएच १५ एफव्ही ७०६५)सह एका भाजी विक्रीच्या दुकानाची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या पोलीस दाखल केली. या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस अमोल पाटील, माजी नगरसेवक दिनकर पाटील, रवींद्र धिवरे यांनी केली आहे. वाहन तोडफोडीची घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली असून, पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -