घरमहाराष्ट्रबोगस शिक्षकांच्या शोधासाठी 1100 टीईटी प्रमाणपत्रांची पडताळणी

बोगस शिक्षकांच्या शोधासाठी 1100 टीईटी प्रमाणपत्रांची पडताळणी

Subscribe

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्त कार्यालयाला पाठवली उत्तीर्ण उमेदवारांची यादी

बोगस शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रमाणपत्रांचा वापर करून शिक्षकांनी नोकरीत बढती मिळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर आता जिल्ह्यातील अकराशे प्रमाणपत्रांची पडताळणी होणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने टीईटी उत्तीर्ण उमेदवारांची यादीच शिक्षण आयुक्त कार्यालयाकडे पाठवली आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शिक्षण विभागाकडून प्रमाणपत्र वाटप केले जात आहे. प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी येणार्‍या व्यक्तिंकडून त्यांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी केली जाते. विशेषत: टीईटी उत्तीर्ण प्रमाणपत्रावरील स्वाक्षरी आणि उमेदवाराने नोंदणी पुस्तिकेवर काढलेल्या स्वाक्षरीशी जुळायला हवी. अन्यथा हे प्रमाणपत्र घेण्यासाठी दुसरीच व्यक्ती आल्याचे ग्राह्य धरुन त्यांना हे प्रमाणपत्र दिले जात नाही. जिल्ह्यातील ११०१ टीईटी उत्तीर्ण उमेदवारांची यादी प्राथमिक शिक्षण विभागाने भिंतीवर चिकटवली आहे. त्यातील क्रमांक हा उमेदवाराच्या प्रवेश पत्राशी सुसंगत असल्याची खात्री पटल्यानंतरच हे प्रमाणपत्र दिले जात आहे. परंतु, नोकरीत बनावट प्रमाणपत्राचा वापर करणार्‍या कर्मचार्‍यांचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी थेट शिक्षण आयुक्त कार्यालयाकडे पाठवले आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर किती शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्राचा वापर केला हे स्पष्ट होईल.

शिक्षकांनी बनावट टीईटी उत्तीर्ण प्रमाणपत्राच्या आधारे नोकरीत बढती मिळवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याआधारे सर्वच प्रमाणपत्रांची पडताळणी करुन घेत आहोत.
– राजीव म्हसकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि. प. नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -