घरताज्या घडामोडीज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं निधन

Subscribe

मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं पुण्यात वृद्धापकाळामुळे निधन झालं. त्यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. १९६१ साली त्यांनी ‘प्रपंच’ या सिनेमाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. मराठीसोबत त्यांनी बऱ्याचं हिंदी चित्रपटात देखील काम केलं आहे. शाळेत असल्यापासून ते नाटकात काम करत होते. त्यांनी स्वतःच्या नाट्यप्रवासावर आधारित ‘नटरंगी रंगलो’ हे आत्मचरित्र लिहिलं आहे. श्रीकांत मोघे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा अभिनेता शंतनू मोघे आणि सून अभिनेत्री प्रिया मराठे असा परिवार आहे.

श्रीकांत मोघे यांचा किर्लोस्करवाडी येथे ६ नोव्हेंबर १९२९ रोजी जन्म झाला होता. किर्लोस्करवाडी येथे त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण झालं. त्यानंतर सांगलीत विलिंग्डन महाविद्यालयात त्यांचं शिक्षण झालं. मग पुण्याच्या स.प. महाविद्यालयात त्यांनी बीएससी केली. त्यानंतर मुंबईत त्यांनी बी.आर्च पदवी घेतली.

- Advertisement -

माहितीनुसार, त्यांनी करिअरची सुरुवात दिल्लीत वृत्तनिवेदक म्हणून केली होती. हिंदी वृत्तनिवेदक म्हणून काम करत असताना श्रीकांत मोघे यांचा परिचय पु.ल. देशपांडे यांच्यासोबत झाला. त्यानंतर त्यांनी पु.ल. देशपांडे यांच्यासोबत ५० वर्ष प्रवास केला. त्यामुळे पु.ल. देशापांडे यांच्या नाटकांमध्ये श्रीकांत मोघे हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसायचे. पु.ल.देशपांडे यांच्या ‘वाऱ्यावरची वरात’ नाटक्यातील त्यांची बोरटाके गुरुजींची भूमिका चांगलीच गाजली होती. त्या काळात श्रीकांत मोघे यांची ओळख ‘चॉकलेट हिरो’ अशी होती. ‘उंबरठा’, ‘दोस्त असावा तर असा’,’भन्नाट भानू’, ‘आम्ही जातो आमुच्या गांवा’,’नवरी मिळे नवऱ्याला’,’गंमत जंमत’ अशा अनेक चित्रपटात श्रीकांत मोघे यांनी काम केलं आहे.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -