घरताज्या घडामोडीज्येष्ठ लेखक, कादंबरीकार नंदा खरे यांचे निधन

ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार नंदा खरे यांचे निधन

Subscribe

ज्येष्ठ लेखक आणि कादंबरीकार अनंत उर्फ नंदा खरे यांचे आज पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते दीर्घकाळापासून आजारी होते. नंदा खरे यांच्या निधनानंतर साहित्य विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

साहित्य विश्वात खरेंचं वेगळं स्थान आहे. अनंत खरे यांना त्यांच्या नंदा खरे या नावाने देखील ओळखले जाते. ते त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखनासाठी ओळखले जातात. त्यांच्या अनेक कादंबऱ्या मराठी साहित्य विश्वात गाजल्या आहेत. ‘अंताजीची बखर’, ‘बखर अंतकाळाची’ आणि ‘उद्या’ ह्या त्यांच्या कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. २०२० साली उद्या नावाच्या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला होता. पण त्यांनी तो नाकारला होता. मला समाजाने आतापर्यंत खूप काही दिलं असं म्हणत त्यांनी हा पुरस्कार नाकारला होता.

- Advertisement -

नंदा खरे यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नागपूरात झाले होते. त्यानंतर त्यांनी मुंबईतील आयआयटी या संस्थेत सिव्हिल इंजीनियरिंगचे शिक्षण घेऊन त्यांनी काही काळ एका खासगी कंपनी काम केले होते, भीमा नदीवर बांधलेले उजणी धरणाच्या बांधकामात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

नंदा खरे यांचे साहित्य

- Advertisement -

अंताजीची बखर, इंडिका, उद्या, ऐवजी, कहाणी मानवप्राण्याची, कापूसकोड्यांची गोष्ट, डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य, दगडावर दगड, नांगरल्याविण भुई, बखर अंतकाळाची, ही त्यांची साहित्यनिर्मिती होती.


हेही वाचा : सर्व महापालिकेत ४ सदस्यांचा एक प्रभाग करा, प्रताप सरनाईकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -