नाशिक : राज्यपाल रमेश बैस यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. संजीव सोनवणे यांची नियुक्ती केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू असलेले डॉ. सोनवणे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्याप विद्यापीठाचे नववे कुलगुरू ठरले आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई वायुनंदन यांचा कार्यकाळ मार्च २०२२मध्ये संपला. त्यानंतर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या निवडीची राज्यपाल रमेश बैस यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. संजीव सोनवणे यांची नियुक्ती केली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी प्र कुलगुरू असलेले डॉ. सोनवणे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्याप विद्यापीठाचे नववे कुलगुरू ठरले आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई वायुनंदन यांचा कार्यकाळ मार्च २०२२मध्ये संपला. त्यानंतर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. राज्यभरातील इच्छुकांच्या मुलाखतींची प्रक्रिया पार पडल्यानंतर राज्यपाल कार्यालयाकडून डॉ. सोनवणे यांची कुलगुरू पदी निवड करण्यात आली.
डॉ. सोनवणे यांनी आतापर्यंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख, मुक्त अध्ययन प्रशाळेचे प्रमुख आदी जबाबदार्या निभावल्या आहेत. सध्या ते प्र कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. वयाची ६५ वर्षे किंवा पाच वर्षे यातील जे आधी होईल त्या कालावधीसाठी डॉ. सोनवणे यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड करण्यात आली. कुलगुरू पदी झालेल्या निवडीबाबत आनंद व्यक्त करून डॉ. सोनवणे म्हणाले, की तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोहोचवण्याची संधी प्राप्त झाली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०नुसार विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करणे, अभ्यासक्रम रोजगारक्षम करणे अशा काही उद्दिष्ट्यांवर काम करण्यास प्राधान्य देण्याचा मनोदय आहे.