घरमहाराष्ट्रविदर्भात कोरोनाचा धोका वाढला! 3,256 नव्या रुग्णांची नोंद

विदर्भात कोरोनाचा धोका वाढला! 3,256 नव्या रुग्णांची नोंद

Subscribe

राज्यात कोरोनाचा धोका वाढत असतानाच विदर्भातही कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. विदर्भात गेल्या २४ तासात ३ लाख १९ हजार ८५२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. विदर्भात सध्या २ लाख ८७ हजार ७३८ रुग्ण बरे झाले असून ७४१८ उपचारादरम्यान मरण पावले आहेत. विदर्भातील नागपूर, अमरावतीमध्ये कोरोनाबाधितांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे विदर्भात कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. बुलडाणा जिल्ह्यात रविवारी ३४० कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. बुलडाण्यात सध्या २,६९९ रुग्ण सक्रिय आहेत. तर जळगाव जामोद तालुक्यात १८४ रुग्ण आढळल्याने जळगाव सध्या कोरोनाचा नवा हॉटस्पॉट ठरत आहे. बुलडाणा शहरात ४१, शेगाव ३०, खामगाव २५, नांदुरा शहरात २७ रुग्णांची नोंद झाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात १८६ नवे रुग्ण सापडले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. यवतमाळमध्ये ८२, पुसद ६०, दिग्रस १२, पांढरकवडा १५, वणी ५, दारव्हा १, घाटंजी ४, महागाव ३, नेर ३, उमरखेड १ अशी रुग्णसंख्या आहे. तर गेल्या २४ तासातं १३१ रुग्ण बरे झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात १६ जण कोरोनातून बरे झाले असून त्यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर ७० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर गोंदियामध्ये गेल्या २४ तासांत ११ जणांना कोरोनाची लागण झाली असून यातील दोन जण उपचारानंतर बरे झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात ३३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे विदर्भात सध्या २ लाख १४ हजार ७५२ जणांचे नमुने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी १ लाख ८९ हजार ११६ जणांनचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये सध्या ८९२ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये कोरोनास्थिती पून्हा चिंताजनक बनत असून प्रशासनासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यात मिनी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा- Maharashtra Assembly Budget Session 2021 : मुंबई अंधारात जाण्यामागे चीनचा हात, ऊर्जामंत्र्यांचा खुलासा

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -