Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रविदर्भMaharashtra Election 2024 : गडचिरोलीने दाखवला शहरी मतदारांना आरसा; नक्षलग्रस्त भागात सर्वाधिक...

Maharashtra Election 2024 : गडचिरोलीने दाखवला शहरी मतदारांना आरसा; नक्षलग्रस्त भागात सर्वाधिक व्होटिंग

Subscribe

राज्यातील सर्वात दुर्गम आणि नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीत दुपारी तीन पर्यंत सर्वाधिक मतदान झाले आहे. तर मुंबईसारख्या महानगरात मात्र, मतदानाची आकडेवारी कमी दिसते आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी मतदानास सुरुवात झाली. राज्यातील सर्वात दुर्गम आणि नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीत दुपारी तीन पर्यंत सर्वाधिक मतदान झाले आहे. तर मुंबईसारख्या महानगरात मात्र, मतदानाची आकडेवारी कमी दिसते आहे.

गडचिरोलीमध्ये दुपारी तीन पर्यंत मतदानाची वेळ होती. तोपर्यंत 62.99 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान होणे हे कौतुकास्पद आहे. गडचिरोलीतील मतदानाची टक्केवारी ही राज्यभरातील 45.53 टक्क्यांपेक्षाही अधिक आहे. मुंबई शहराबाबत बोलायचे तर तेथील एकूण मतदानापेक्षाही गडचिरोलीत जास्त मतदान झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Election 2024 : बीडमध्ये उमेदवाराचा मृत्यू, तर साताऱ्यात मतदाराला हार्टअटॅक

आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, मुंबई शहरात दुपारी तीन पर्यंत एकूण 39.34 टक्के मतदान झाले. मुंबई शहरासोबतच संपूर्ण महाराष्ट्रातील विधानसभेच्या कोणत्याही जागेसाठी झालेल्या एकूण मतदानापेक्षा हा आकडा जास्त आहे. थोडक्यात, मतदानासाठी मुंबईकर फारसे उत्साही दिसत नाहीत. त्यामुळे मुंबईकरांनी गडचिरोलीसारख्या ग्रामीण आणि नक्षली भागाकडून शिकले पाहिजे.

- Advertisement -

सकाळी 11 वाजेपर्यंत राज्यभरातल्या मतदानातही गडचिरोलीच आघाडीवर होते. सकाळी 11 पर्यंत इथे 30 टक्के मतदान झाले होते. तर सकाळी 9 वाजेपर्यंत गडचिरोलीत एकूण 12 टक्के मतदान होते पण त्याचवेळी राज्याच्या इतर भागातील मतदान हे अवघे 6.61 टक्के एवढे होते.

राज्यातील गडचिरोली हा भाग प्रामुख्याने नक्षलवादासाठी ओळखला जातो. तसेच राज्यातील इतर भागांच्या तुलनेत हा भाग मागास आहे. मात्र, या निवडणुकीत गडचिरोलीतून जे आकडे समोर येत आहेत, ते उत्साह वाढवणारे आहेत. दुपारी 1 वाजेपर्यंत गडचिरोलीत एकूण 50.89 टक्के मतदान झाले. तर 11 वाजेपर्यंत तेथे 30 टक्के मतदानाची नोंद झाली, जे राज्यभरात सर्वाधिक आहे.

हेही वाचा – Maharashtra Election 2024 : जनता पॉझिटिव्ह कामच निवडणार, मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला विश्वास


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -