Homeमहाराष्ट्रविदर्भJaynat Patil : अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जयंत पाटलांची बॅटिंग; मुख्यमंत्री फडणवीसांनीही केले...

Jaynat Patil : अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जयंत पाटलांची बॅटिंग; मुख्यमंत्री फडणवीसांनीही केले कौतुक

Subscribe

नागपूर – हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी सरकावर मिश्किल शब्दात टीका केली. महायुतीचे सरकार स्थापन झाले. 15 डिसेंबरला 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र गेल्या सहा दिवसांपासून अधिवेशन सुरु आहे मात्र बिन खात्याचे मंत्री या अधिवेशनात राहिले. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकटेच देत आहेत. यामुळे उर्वरीत मंत्र्यांनी सरकारमधील आपली गरज लक्षात घ्यावी, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

एकटे देवेंद्र फडणवीस सरकार चालवू शकतात

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष तथा विधानसभा सदस्य जयंत पाटील म्हणाले की, मंत्रिमंडळाने शपथग्रहण करुन एक आठवाडा झाला आहे. मात्र खाते वाटप अजून झाले नाही. गेल्या सहा दिवसांपासून बिन खात्याच्या मंत्र्यांचे अधिवेशन झाले. सर्व प्रश्नांचे उत्तर एकट्या मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे यातून मंत्र्यानी लक्षात घेतले पाहिजे की आपली सरकारमध्ये किती गरज आहे. 237 आमदारांचा मुख्यमंत्र्यांना पाठिंबा आहे. ते एकटेच पुरेसे आहेत, असे गेल्या सहा दिवसातून दिसले आहे. सर्व चर्चांना एकट्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. एकटे देवेंद्र फडणवीस सरकार चालवू शकतात, असे म्हणत जयंत पाटील यांनी मंत्र्यांना टोला लगावला.

हेही वाचा : Suresh Dhas : आमदार सुरेश धस यांनी परळी पिक विमा पॅटर्नचा फाडला बुरखा; पंतप्रधांनाना करणार ही विनंती

सरकारमधील नाराजीवर जयंत पाटलांचा टोला

जयंत पाटील म्हणाले की, ध्यानीमनी नसताना एवढे मोठे यश मिळाले आहे. जनताही चक्रावून गेली आहे. निवडून आलेल्या आमदारांनाही विश्वास बसत नाही. यश मिळाल्यानंतर सरकार स्थापन करण्याचे सोडून काही लोक दिल्लीत जाऊन बसले. नियमीत जाऊ लागले. कोणी थेट गावी जाऊन बसले. त्यावेळी मला बॉबी चित्रपटातील एक गाण्याची आठवण झाली. झुठ बोले कौवा काटे… हे ते गाणे. गाण्याच्या ओळी म्हणत जयंत पाटील यांनी सरकारमधील मुख्यमंत्री आणि एका उपमुख्यमंत्र्यांमधील वादावरुन टोला लगावला. या गाण्यात एक ओळ आहे, तु मैके चली जाएगी, तो मै दुजा ब्याह रचाऊंगा.. असे म्हटल्यानंतर नाराजी संपली, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

मारकडवाडीत मॉक पोल घ्या…

महायुती सरकारच्या विजयाबद्दल अनेकांना संशय आहे. तो दूर करण्याची संधी मारकडवाडी येथे मॉक पोल घेऊन करता येईल. असं सांगत जयंत पाटील म्हणाले की, शरद पवारांनी निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेबद्दल आक्षेप घेतले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाची बाजू मांडणं हे योग्य दिसत नाही. मारकडवाडी येथील आमचे आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत होते. तिथे मॉकपोल तरी घ्या. हवे असेल तर सरकारच्या नियंत्रणात घ्या, असेही जयंत पाटील म्हणाले.

हेही वाचा : Jayant Patil : जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना करुन दिली 2014, 2019 मधील जाहीरनाम्याची आठवण; फडणवीस म्हणाले…

Edited by – Unmesh Khandale

Unmesh Khandale
Unmesh Khandale
मागील १५ वर्षांपासून पत्रकारितेत. राष्ट्रीय, आणि राज्य पातळीवरील सामाजिक, राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.