घरमहाराष्ट्रVideo : गोव्यात दरड कोसळल्याने ट्रेन ढिगाऱ्याखाली

Video : गोव्यात दरड कोसळल्याने ट्रेन ढिगाऱ्याखाली

Subscribe

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे हाहा:कार उडाला आहे. अनेक भागांत दरड कोसळून शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. तर पुरामुळे वाहतुक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. यात कोकण रेल्वे मार्गावरही दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. गोव्यामध्ये मंगळूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका ट्रेनवर मोठी दरड कोसळली आहे. यामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली ही ट्रेन गेली अनेक तास अडकून पडली आहे. या अपघातग्रस्त ट्रेनमधील प्रवाशांना कुलेम येथे माघारी धाडण्यात आले आहे.

कर्नाटकमधील मंगळूरहून मुंबईकडे येणारी ही गाडी शुक्रवारी अपघातग्रस्त झालीय. या घटनेचा एक व्हिडिओ आता समोर येत आहे. ही ट्रेन दुधसागर- सोनोलिम विभागादरम्यान रेल्वे रुळावरून खाली उतरली अशी माहिती समोर येत आहे. ०११३४ मंगळूर जंक्शन-सीएसएमटी एक्स्प्रेस ही ट्रेन अपघातग्रस्त झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणताही जीवितहानी घडलेली नाही. मात्र याचा मोठा फटका आता कोकण रेल्वे मार्गाला बसला आहे.

- Advertisement -

विशेष बाब म्हणजे चिपळूणमधील पुरामुळे या रेल्वे मार्गात बदल करुन ती मडगाव-मिरजमार्गे वळवण्यात आली होती. दुधसागर आणि सोनोलिम स्थानकादरम्यान आणि करंजोल व दुधसागर स्थानकादरम्यानमधील दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागादरम्यानच्या घाट विभागात भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यामुळे मोठा मातीचा मोठा ढिगारा रुळावर कोसळला. सध्या या भागात वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.

- Advertisement -

याशिवाय ०२७८० हजरत निजामुद्दीन-वास्को द गामा एक्स्प्रेसचासुद्धा रद्द झालेल्या गाड्यांमध्ये समावेश आहे. बुधवारी दिल्ली येथून मार्गत स्त झालेल्या या ट्रेनला लौंडा आणि वास्कोदरम्यान अंशत: रद्द करण्यात आले आहे. तसेच ट्रेन नंबर ०८०४८ वास्को द गामा-हावडा एक्स्प्रेस, ०७४२० वास्को द गामा-तिरुपती एक्स्प्रेस आणि ०७४२०/७०२२ वास्को द गामा तिरुपती हैदराबाद एक्स्प्रेस या गाड्यासुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत.


सरकारी कार्यालयात ड्रेसकोडनंतर आता मोबाईल वापरासाठी नवे नियम, जाणून घ्या नियम

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -