घरमहाराष्ट्रनाशिकत्र्यंबकेश्वरमधील मंदिराच्या पिंडीवर पुजाऱ्यांनीच ठेवला होता बर्फ; पोलीस तपासातून माहिती उघड

त्र्यंबकेश्वरमधील मंदिराच्या पिंडीवर पुजाऱ्यांनीच ठेवला होता बर्फ; पोलीस तपासातून माहिती उघड

Subscribe

मागच्या वर्षी २०२२ मध्ये त्र्यंबकेश्वरमधील मंदिरातील गाभाऱ्यातील असलेल्या पिंडीवर अचानक बर्फ तयार झाला असल्याचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. पण हा पिंडीवर बर्फ काही अचानक तयार झाला नव्हता अशी माहिती आता समोर आली आहे. तसेच याप्रकरणी मंदिरातील तीन पुजाऱ्यांना अटक देखील करण्यात आली आहे

मागच्या वर्षी 2022 मध्ये त्र्यंबकेश्वरमधील मंदिरातील गाभाऱ्यातील असलेल्या पिंडीवर अचानक बर्फ तयार झाला असल्याचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. पण हा पिंडीवर बर्फ काही अचानक तयार झाला नव्हता अशी माहिती आता समोर आली आहे. तसेच याप्रकरणी मंदिरातील तीन पुजाऱ्यांना अटक देखील करण्यात आली आहे.

सध्याच्या काळात देवाच्या नावावर अनेकांची फसवणूक करण्यात येते. बहुतेक वेळा तर मंदिरातील पुजारीच भाविकांच्या भावनेशी खेळताना दिसून येतात. असाच काहीसा प्रकार मागच्या वर्षी जून महिन्यामध्ये प्रसिद्ध अशा त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये घडला होता. 30 जून 2022 मध्ये पहाटेच्या वेळी त्र्यंबकेश्वर मंदिरात असलेल्या गाभाऱ्यातील पिंडीवर अचानकपणे बर्फ जमा झाल्याचे आढळून आले होते. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. पण हे सर्व काही खोटे असून हा बनाव असल्याचे आता उघड झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी देवस्थान समितीच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक तर्क लावण्यात आले होते. त्र्यंबकेश्वरमध्ये असलेले हवामान आणि मंदिराच्या गाभाऱ्यातील तापमान यामुळे पिंडीवर बर्फ कसा तयार होऊ शकतो? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सत्यशोधन समिती तयार करण्यात आली. या समितीने मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली, या सीसीटीव्ही फुटेजमधून धक्कादायक माहिती समोर आली.

हेही वाचा – माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांची मालमत्ता जप्त; इक्बाल मिर्ची प्रकरणी ईडीची कारवाई

- Advertisement -

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुंगार ट्रस्टचे तीन पुजारी या पिंडीवर बर्फ ठेवत असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, उत्तराखंडमध्ये असलेल्या अमरनाथ प्रमाणेच त्र्यंबकेश्वरमध्ये देखील शंकराच्या पिंडीवर बर्फ तयार झाल्याचा खोटा प्रचार करण्यात आला. त्यामुळे आता या प्रकरणात मंदिरातील पुजारी सुशांत तुंगार, आकाश तुंगार आणि उल्हास तुंगार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2022 मध्ये हा व्हीडिप व्हायरल झाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा व्हिडीओ खोटा असल्याचा दावा देखील केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -