घरठाणेVideo : मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला मारहाण

Video : मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला मारहाण

Subscribe

ठाणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट (Social Media Post) करणाऱ्या काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी भररस्त्यात मारहाण केल्याची घटना ठाणे येथे घडली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली. तसंच, या घटनेचा व्हिडीओही त्यांनी शेअर केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, “माननीय महाराष्ट्र राज्याचे नामदार मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांच्यावर आक्षेपार्य पोस्ट करणारा काँग्रेस ठाणे प्रवक्ता गिरीश कोळी ह्याला शिवसेना कोपरी उपविभाग प्रमुख बंटी बाडकर व त्यांचे सहकारी शिवसैनिक ह्यांनी चोप दिला तसेच ती आक्षेपार्ह पोस्ट डिलिट करण्यात आली व माफी मागितली. हे इतर कुठल्या पक्षाच्या नेत्यासाठी कार्यकर्त्यांनी केले तर ते गुंड .. मग पोलीस छळणार .. स्वत: मुख्यमंत्री त्यात हस्तक्षेप करणार… जेलमध्ये सडवणार. हे सगळे मी गेले तीन वर्ष अनुभवतो आहे आणि मागचे ३५ दिवस तर सगळ्या मर्यादा पार.”

- Advertisement -

हेही वाचा – आमदार जितेंद्र आव्हाडांच्या माजी अंगरक्षकाच्या आत्महत्येने करमुसे प्रकरणाला नवे वळण?

याबाबत त्यांनी एक व्हिडीओही ट्वीटरवर शेअर केला आहे. यामध्ये तिघेजण एकाला मारहाण करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. तिघेजण वृद्धाच्या कानाखाली मारत असून आक्षेपार्ह भाषेत पोस्ट डिलिट करण्यासाठी धमकी देण्यात येत आहे. वृद्धाने याप्रकरणी मध्यस्थी करत त्यांनी पोस्ट डिलिट करण्याचे आश्वासन देत जाहीर माफी मागणार असल्याचे सांगितले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -