Vidhan Bhavan : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधान भवनात होणार दोन शिफ्टमध्ये काम, राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कार्यालयातील उपस्थिती नियंत्रित करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने सचिवालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची विभागणी दोन सत्रांत केली आहे.

assembly work schedule 2 shift
Vidhan Bhavan : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधान भवनात होणार दोन शिफ्टमध्ये काम, राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील कोरोना पादुर्भाव वाढल्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे गर्दी न करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. तसेच सरकारी कार्यालये आणि शासकीय कार्यालयांतही ५० टक्के आसन क्षमतेनुसार कर्मचाऱ्यांना बोलवण्यात यावे असेही राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. राज्य सरकारमधी मंत्री, आमदार आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्यामुळे अधिक खबरदारी घेण्यातयेत आहे. विधान भवनात आता दोन शिफ्टमध्ये काम होणार आहे. राज्य सरकारडून दोन सत्रांत काम करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.

राज्यात मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. मंत्रालयात आणि विधान भवनातील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. विधानभवनात गर्दी होऊ नये आणि कर्मचाऱ्यांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी कामाची वेळ दोन सत्रांत विभागली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात कर्मचाऱ्यांना कामावर बोलवण्यात येणार आहे. राज्य सरकारने असा आदेश जारी केला आहे.

राज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कार्यालयातील उपस्थिती नियंत्रित करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने सचिवालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची विभागणी दोन सत्रांत केली आहे. यानुसार पहिले सत्र सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. तर दुसरे सत्र दुपारी १ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत असेल. निर्देशानुसार दोन सत्रांत कर्मचाऱ्याची विभागणी करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू केली आहे. पर्यटन स्थळांवर गर्दी होत असल्यामुळे पर्यटकांवर बंदी घातली आहे. सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्यासाठी दोन लसीचे डोस घेणे बंधनकारक असणार आहे.


हेही वाचा : शरद पवार पंतप्रधान होणार का?; चंद्रकांत पाटलांच्या प्रश्नावर संजय राऊतांचे रोखठोक उत्तर