घरमहाराष्ट्रभाजप-राष्ट्रवादी वाद उफाळला, विद्या चव्हाणांचे मोहित कंबोजांना चोख प्रत्युत्तर

भाजप-राष्ट्रवादी वाद उफाळला, विद्या चव्हाणांचे मोहित कंबोजांना चोख प्रत्युत्तर

Subscribe

'विद्याताई चव्हाण यांना जय श्रीराम', असं मोहिम कंबोज यांनी ट्विट केलं आहे. यावरून विद्या चव्हाण आक्रमक झाल्या असून मोहित कंबोज यांचा इतिहासच वाचून दाखवला आहे. 

मुंबई – भाजपा नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी राष्ट्रवादी नेत्यांविरोधात रणशिंगे फुंकले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी अजित पवारांना (NCP Leader Ajit Pawar) टार्गेट केलं होतं. त्यानंतर, रोहित पवारांनावरही (NCP Leader Rohit Pawar) त्यांनी निशाणा साधला होता. दरम्यान, त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण (NPC MLA Vidya Chavan) यांना डिवचलं. बिल्कीस बानो प्रकरणी विद्या चव्हाण यांनी आंदोलन केल्याने मोहित कंबोज यांनी विद्या चव्हाण यांना ट्विटरद्वारे इशारा दिला आहे. ‘विद्याताई चव्हाण यांना जय श्रीराम’, असं मोहिम कंबोज यांनी ट्विट केलं आहे. यावरून विद्या चव्हाण आक्रमक झाल्या असून मोहित कंबोज यांचा इतिहासच वाचून दाखवला आहे.


विद्या चव्हाण म्हणाल्या की, ‘मोहित कंबोज ठग असून तो भारतीय जनता पक्षाचा मनी सप्लायर आहे. त्याने मला ‘जय श्रीराम’ केलंय तर मी देखील त्याला ‘हर हर महादेव, जय जय बजरंग बली तोड दे दुश्मन की नली, जय सियाराम’ असं म्हणत उत्तर दिलं आहे. आम्ही प्रभू रामचंद्रांच्या आधी सितामय्याचं नाव घेतो, कारण आम्ही सच्चे हिंदू आहोत, आमचं हिंदुत्व ढोंगी नाही, त्यांचं हिंदुत्व ढोंगी आहे.’

- Advertisement -

हेही वाचा – न्यायालयाच्या कामकाजावर भाष्य करू नका, भरत गोगावलेंच्या बेताल वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांची सर्वांना तंबी

प्रसारमाध्यमांशी बोलताना विद्या चव्हाण म्हणाल्या की, भाजपाचे बरेच नेते माझ्या ओळखीचे आहेत. मोहित कंबोज यांना मी पूर्वी ओळखत नव्हते. मात्र एका निवडणुकीच्या काळात मी दिंडोशी-मालाड परिसरात होते. तेव्हा पोलिसांनी नोटांच्या बॅगेसह मोहित कंबोज यांना पकडले होते. त्यावेळी मोहित कंबोज मतदारांना पैसे वाटत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या सगळ्याविरोधात पोलिसांत धाव घेतली होती. तेव्हा पोलीस मोहित कंबोज यांना घेऊन पोलीस ठाण्यात आले. पण तेव्हा गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना फोन करून मोहित कंबोज यांना सोडायला सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – ’75 वर्षांतील सर्वात भ्रष्ट सरकार’, विश्वासदर्शक ठराव मांडत केजरीवालांचा मोदी सरकावर हल्लाबोल

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -