घरताज्या घडामोडीCruise Drugs Case: आर्यनकडून २५ कोटी खंडणी प्रकरणात समीर वानखेडेंची चौकशी सुरु,...

Cruise Drugs Case: आर्यनकडून २५ कोटी खंडणी प्रकरणात समीर वानखेडेंची चौकशी सुरु, ५ अधिकाऱ्यांची टीम NCB कार्यालयात दाखल

Subscribe

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एनसीबी ड्रग्ज कारवाईमध्ये पंच असलेला प्रभाकर साईलने २५ कोटी खंडणीसाठी शाहरुख खानच्या मॅनेजरला फोन केला असल्याचा आरोप केला आहे. या आरोपाची चौकशी करण्यासाठी दिल्लीतून ५ अधिकाऱ्यांची टीम मुंबईत दाखल झाली आहे. समीर वानखेडे यांच्याविरोधातील सर्व माहिती गोळा केली असून वानखेडेंची चौकशी सुरु करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत माहिती काही कालावधीनंतर देण्यात येईल अशी माहिती एनसीबी उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली आहे.

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी २ ऑक्टोबर रोजी मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझवर छापेमारी केली. ही क्रूझ गोवाच्या दिशेना जात असताना कारवाई केली. यामध्ये अभिनेता शाहरुख खान पुत्र आर्यन खानला अटक करण्यात आली आहे. आर्यन खानच्या सुटकेसाठी एनसीबी कार्यालयातून शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीला फोन करुन २५ कोटी रुपयांची खंडणी मागितली असल्याचा आरोप पंच प्रभाकर साईलने केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दिल्लीतील ५ अधिकारी एनसीबी कार्यालयात दाखल झाले आहेत. वानखेडेंची चौकशी करण्यास सुरु केले असल्याची माहिती एनसीबी उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली आहे.

- Advertisement -

एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, समीर वानखेडे यांचा २५ करोड खंडणी प्रकरणात जबाब नोंदवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. व्हिजिलन्स टीमकडून चौकशी करण्यात येत आहे. काही लोकांना तसेच साक्षीदारांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांनी काही कागदपत्र आणि रेकॉर्डिंग्ज ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणात कोणाचे जबाब नोंदवण्यात येणार असा प्रश्न केला असता सिंह म्हणाले की, प्रभाकर साईलच्या प्रतिज्ञापत्रात ज्यांची नावे आहेत. तसेच यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांचे स्टेटमेंट आणि रेकॉर्ड तपासण्यात येणार आहेत. शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीचसुद्धा स्टेटमेंट आणि रेकॉर्ड तपासले जाऊ शकते.


हेही वाचा : समीर वानखेडे मुस्लिमच! आता खोटं बोलताहेत; निकाह लावणाऱ्या काझी अहमदचा दावा

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -