घरमहाराष्ट्रमुंबई क्रिकेटवरही मुख्यमंत्र्यांची मोहोर

मुंबई क्रिकेटवरही मुख्यमंत्र्यांची मोहोर

Subscribe

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीच्या राजकारणानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनवरही (एमसीए) आपली मोहोर उमटवली आहे. त्यांचे बालपणीचे मित्र, उद्योजक असलेल्या अमोल काळे यांची एमसीएच्या उपाध्यक्षपदी, तर संजय नाईक यांची सचिव म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. तसेच विजय पाटील यांचीही एमसीएच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. हे तीनही उमेदवार बाळ म्हाडदळकर गटाचे आहेत.

एमसीएची निवडणुक कधी होणार?, याबाबत बरीच चर्चा सुरु होती. अखेर ४ ऑक्टोबर ही निवडणुकीची तारीख ठरवण्यात आली. अचानक ही तारीख जाहीर झाल्याने उमेदवार, मतदार आणि कार्यकर्ते यांची चांगलीच धावफळ झाली. मतदानाची प्रक्रिया ४ ऑक्टोबर अर्थात शुक्रवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत पार पडणार आहे. या निवडणुकीचे निकाल दुपारी ३ वाजेपर्यंत बीसीसीआयला कळवायचे आहेत. ही निवडणूक समितीतील एकूण १७ जागांसाठी होणार आहे. लोढा समितीच्या सुधारणा शिफारशींच्या अंमलबजावणीमुळे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना पहिल्यांदा एमसीएच्या निवडणुकीत मतदान करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, झहीर खान यांच्यासह ३९ जणांचा समावेश आहे. काही महिला क्रिकेटपटूही मतदान करणार आहेत.

- Advertisement -

यापूर्वी विलासराव देशमुख, शरद पवार, आशिष शेलार यांसारख्या राजकारण्यांनी एमसीएचे अध्यक्षपद भूषवले आहे. मात्र, लोढा समितीच्या सुधारणा शिफारशींच्या अंमलबजावणीमुळे संसदीय सदस्य असलेल्यांना एमसीएची निवडणूक लढण्याचा अधिकार नाही. त्यामुळे राजकारण्यांनी आता वेगळा मार्ग अवलंबला आहे. त्यांनी स्वतःऐवजी आपल्या गोटातील लोकांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. काळे यांची नुकतीच श्री तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -