घरमहाराष्ट्रपुणेVijay Shivtare : शरद पवारांमुळे ग्रामीण भागात दहशतवादाचा उगम, शिवतारेंचा गंभीर आरोप

Vijay Shivtare : शरद पवारांमुळे ग्रामीण भागात दहशतवादाचा उगम, शिवतारेंचा गंभीर आरोप

Subscribe

शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबियांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आज त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

पुणे : मी जिंकण्यासाठी लढत असून माझी लढाई पवारांविरोधात असल्याचे म्हणत शिवसेना (शिंदे गट) नेते विजय शिवतारे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. शिवतारेंनी आज रविवारी (ता. 24 मार्च) कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट करत बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा केली. परंतु, याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. (Vijay Shivtare alleges that terrorism has spread in rural areas due to Sharad Pawar)

हेही वाचा… Vijay Shivtare : उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख ठरली, वेळही ठरली; शिवतारेंनी लोकसभेचे रणशिंग फुंकले

- Advertisement -

यावेळी बोलताना शिवसेना नेते विजय शिवतारे म्हणाले की, माझ्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश आहे, आता माझ्याबाबतीत ते कन्फुजन करत आहेत की, विजय शिवतारे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत. त्यांच्यावर महायुतीमधील नेत्यांमधून दबाव येईल, ते काहीतरी सेटलमेंट करतील. तुमच्या माध्यमातून मी महायुतीतील नेत्यांना विनंती करतो की, ही लढाई मला लढू द्या. ही धर्माची लढाई आहे. राजकारणाची स्वच्छता करायची असेल तर मला हे करावे लागेल, असे म्हणत शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यासोबतच महायुतीमधील नेतेमंडळींना आवाहन केले आहे.

तसेच, ज्याप्रमाणे आपण दहशतवाद पसरवला असे म्हणतो, त्याचप्रमाणे पवारांनी देखील ग्रामीण भागांत दहशतवाद पसरवला आहे. ग्रामीण भागात दहशतवाद निर्माण करण्याचे काम शरद पवारांनी केले आहे. त्यामुळे हा ग्रामीण दहशतवाद मोडून काढण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे. एका राक्षसाला थांबवण्यासाठी दुसरा राक्षस मोठा केला तर अडचण होईल. यांनी ग्रामीण भागात दहशत पसरवला आहे. अनेकांना दुखावले आहे. हा विंचू अनेकांना डसला आहे, आता तो विंचू मोदी साहेबांजवळ जाऊन बसला आहे. आता दोन्ही शक्तींचा बिमोड करायला पाहिजे. निवडून आल्यानंतर विजय शिवतारे महाराष्ट्रासाठी फकिर म्हणून काम करेल, असे म्हणत शिवतारेंनी पवार कुटुंबियांवर निशाणा साधला.

- Advertisement -

शरद पवारांमुळे ग्रामीण दहशतवाद पसरला आणि तो पुढे अजित पवारांनी नेला, असा गंभीर आरोप करत शिवतारे म्हणाले की, माझ्या माणसांना त्रास दिला जात आहे. अजित पवारांनी खूप पाप केली आहेत. अख्ख्या राज्याला ग्रामीण दहशतवाद शब्द माहिती पडेल. 70 वर्षात त्यांनी काय केले? तर, फक्त घुसले आणि घुसखोरी केली. ईस्ट इंडिया कंपनी आहे ती गेली आणि पवारांची कंपनी आली. अजित पवार आणि शरद पवार म्हणजे एक राक्षस आणि दुसरा ब्रह्मराक्षस हसून दोघांचा खात्मा करायचा आहे, असेही शिवतारेंनी सांगितले.

माझ्या व्यासपीठावर कोणताही मोठा नेता उपस्थित राहणार नाही. माझ्यासोबत फक्त जनसामान्य दिसतील. माझी ओळखपत्रो गावा-गावात वाटली जातील. 1 एप्रिल रोजी सभा झाल्यानंतर पाच विधानसभा मतदारसंघांत सभा घेतल्या जातील. या सभांमध्ये त्या त्या भागातील प्रश्न मांडले जातील. जनसामान्यांच्यादृष्टीने महत्त्वाच्या या सभा असतील, त्यामुळे आता 12 एप्रिलला 12 वाजता बारामती लोकसभा मतदारसंघातून माझा उमेदवारी अर्ज दाखल करून प्रस्थापितांचे 12 वाजवणार आहे,” अशी घोषणाच विजय शिवतारे यांनी केली आहे. त्यामुळे शिवतारे यांनी लोकसभेचे रणशिंग फुंकले असल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -