घरताज्या घडामोडीमीच शिवसेनेतून बाहेर पडलो, हकालपट्टी कशी करणार? विजय शिवतारे यांचा पलटवार

मीच शिवसेनेतून बाहेर पडलो, हकालपट्टी कशी करणार? विजय शिवतारे यांचा पलटवार

Subscribe

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर शिवसेनेने आपल्याला विधान परिषदेवर संधी देऊन मंत्रिमंडळात समावेश करावा अशी त्यांची इच्छा होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटात सामील झालेले माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांची शिवसेनेतून अखेर हकालपट्टी करण्यात आली. यावेळी शिवतारे यांनी देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रत्युत्तर दिले. (Vijay Shivtare counter to Uddhav Thackeray)

हेही वाचा – मोठी बातमी! शहरप्रमुखांसह बदलापूरमधील सेनेचे सर्व नगरसेवक शिंदे गटात सामील

- Advertisement -

शिवतारे हे फडणवीस सरकारमध्ये जलसंपदा राज्यमंत्री होते. त्यानंतर २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाले होते. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर शिवसेनेने आपल्याला विधान परिषदेवर संधी देऊन मंत्रिमंडळात समावेश करावा अशी त्यांची इच्छा होती. मात्र तसे न झाल्याने विजय शिवतरे नाराज होते. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर विजय शिवतारे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.

शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर विजय शिवतरे यांनी आज भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की २९ जूनला पत्रकार परिषद घेऊन पुण्यात माध्यमांसमोर मी माझी भूमिका मांडली होती. त्यावेळी मी म्हणालो होतो की, महाविकास आघाडी सरकार आम्हाला मान्य नाही. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत फारकत घ्यावी. एकनाथ शिंदेंचीही भूमिका हीच होती. मात्र आमच्या मागणीला मातोश्रीने प्रतिसाद दिला नाही. याच कारणासाठी मी एकनाथ शिंदेंसोबत गेलो. पण उद्धव ठाकरे हे करायला तयार नव्हते. मीच आधी शिवसेनेतून बाहेर पडलो असताना पक्षप्रमुख माझी काय हकालपट्टी करणार? असा सवाल त्यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – शिंदेंच्या मंत्रिमंडळातील चार महत्त्वाचे निर्णय, MMRDAला ६० हजार कोटींचे कर्ज

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

मी एकनाथ शिंदेंसोबत जात असल्याचे जाहीर केल्यानंतर मला साधा फोनही उद्धव ठाकरेंनी केला नाही. मी त्यांना अडीच वर्षात अनेक पत्र लिहिली. भेटीची वेळ मागितली. पण मला प्रतिसाद मिळाला नाही. आता सर्व संपले आहे, ही तर सुरुवात आहे. अख्ख्या महाराष्ट्रातून, जिल्ह्याजिल्ह्यातून काम करणारे स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी शिंदेंसोबत असतील, असा इशारा शिवतारेंनी यावेळी दिला.

विजय शिवतारे यांनी शिवसेनेत पडलेली फूट खासदार संजय राऊत यांच्यामुळे पडल्याचा नवीन आरोप केला. वैद्यकीय क्षेत्रात स्किझोफ्रेनिया नावाचा एक रोग आहे. अशा माणसाला बाकीचे काही रोग नसतात. बहुतेक हा रोग हुशार माणसांनाच होतो. ही माणसे अती विचाराच्या गर्तेत जातात आणि तिथे पाण्यात डुंबून जातात आणि वेगवेगळ्या प्रकारचे भास त्यांना होत असतात, अशा शब्दांत शिवतारे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -