घरमहाराष्ट्रपुणेVijay Shivtare : ...तर भाजपाच्या चिन्हावरही निवडणूक लढवेन, शिवतारेंमुळे मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली

Vijay Shivtare : …तर भाजपाच्या चिन्हावरही निवडणूक लढवेन, शिवतारेंमुळे मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली

Subscribe

पुणे : शिवसेना (शिंदे गट) नेते विजय शिवतारे हे महायुतीत असून देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात आक्रमक भाष्य करत आहेत. विजय शिवतारे यांच्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची या लोकसभेसाठीची उमेदवारी निश्चित झाली आहे. पण दुसरीकडे मात्र, विजय शिवतारे हे देखील महायुतीकडून बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी आतापर्यंत अनेकवेळा मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आहे. पण आता शिवतारेंनी केलेल्या एका नव्या विधानामुळे मुख्यमंत्री अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. (Vijay Shivtare from Baramati Lok Sabha ready to fight on BJP’s lotus symbol)

हेही वाचा… Vijay Shivtare : मला तुमचा आशीर्वाद हवा…, पाठिंब्यासाठी शिवतारे पोहोचले काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या घरी

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून विजय शिवतारे बारामती लोकसभेत फिरत आहेत, कार्यकर्त्यांना भेटत आहेत, या मतदारसंघात अजित पवारांविरोधात मोर्चेबांधणी करत आहेत. विजय शिवतारे सातत्याने अजित पवारांविरोधात वक्तव्ये करत असल्यामुळे महायुतीतलं वातावरण तापलं आहे. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेत्यांनी शिवतारे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली. ज्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंची भेट घेत त्यांना समज देखील दिली. पण त्याचाही काही उपयोग झाला नसून विजय शिवतारे यांनी उमेदवारी मिळाल्यास भाजपाच्या कमळ चिन्हावर देखील निवडणूक लढवेन, असे विधान केले आहे. त्यामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना विजय शिवतारे म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की, महायुतीत बारामती लोकसभेची जागा आपण मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. ही जागा आपल्याला मिळाल्यास तिथे आपण 100 टक्के जिंकू शकतो. धनुष्यबाणाच्या चिन्हावर इथे निवडणूक लढलो तर आपण ही निवडणूक जिंकू. मी गेल्या 15 ते 20 दिवसांमध्ये बारामतीत अनेक ठिकाणी फिरलो आहे. लोकांशी चर्चा केल्यानंतर मला आत्मविश्वास मिळाला आहे. तसेच या मतदारसंघातील मतांचे गणित मी मुख्यमंत्र्यांपुढे मांडले. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे की, अगदीच गरज पडली तर मी भाजपाच्या चिन्हावर बारामती लोकसभा लढवण्यास तयार आहे. त्यामुळे आता शिवतारेंच्या या विधानामुळे मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

तसेच, गेल्या अनेक वर्षांपासून युतीत बारामती लोकसभेची जागा भारतीय जनता पार्टीकडे आहे. त्यामुळे ही जागा मिळाली नाही तर भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याला माझी हरकत नाही. मी कमळ चिन्हावर निवडणूक लढण्यास तयार आहे. मी याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. गेले दोन दिवस विचारमंथन करून, लोकांशी बोलूनच मी या निर्णयापर्यंत पोहोचलो आहे. महायुतीत जर अशा पद्धतीने निर्णय झाले तर ते सोयीस्कर होतील. मी अगदी स्पष्ट सांगतो की, प्रत्येक मतदारसंघातील इलेक्टिव्ह मेरिट पाहायला हवे. कारण आपल्यासाठी एकेक खासदार महत्त्वाचा आहे. आपल्याला नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचे आहे. मी अपक्ष लढण्याचा विचार केला. परंतु, असे अपक्ष लढण्याऐवजी मी आमच्या नेतेमंडळींना म्हटले आहे की, तुम्ही महायुतीत बारामती लोकसभेची जागा मागावी. ती जागा मिळाल्यास मी 100 टक्के ही जागा जिंकून दाखवेन, असे दावा विजय शिवतारे यांच्याकडून करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -