Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी OBC Reservation : विजय वडेट्टीवारांनी सांगितली आरक्षणाची डेडलाईन

OBC Reservation : विजय वडेट्टीवारांनी सांगितली आरक्षणाची डेडलाईन

सर्वपक्षीय निवडणुकीमध्ये सध्या इम्पेरिकल डेटा गोळा करण्यावर एकमत करण्यात आलं आहे.

Related Story

- Advertisement -

ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुका होऊ न देण्यावर भाजप ठाम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली या बैठकीत ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा एप्रिलपर्यंत मार्गी लागेल असे विधान राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. सर्वपक्षीय बैठकीत ओबीसी आरक्षणासाठी लागणारा इम्पेरिकल डेटा गोळा करण्यास राज्य मागास आयोगाला सांगण्यााबत निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे मुख्यसचिव आणि राज्य मागासवर्ग आयोग पुढील कार्यवाही करतील असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

ओबीसी आरक्षणासंदर्भातील प्रश्न मार्च ते एप्रिलपर्यंत निकाली लागतील असं काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे. वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की, सर्वपक्षीय बैठकीमध्ये २ ते ३ मुद्द्यांवर चर्चा झाली. इम्पेरिकल डेटा किती कालावधीत पुर्ण व्हावा याविषयी चर्चा करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणाबाबत आणि निवडणुका पुढे ढकलाव्यात यावर चर्चा करण्यात आली. दुसरीकडे निवडणुका घेऊन ओबीसींचे शुन्यावर असलेलं आरक्षण कसं वाचवता येईल यावर चर्चा झाली. इम्पेरिकल डेटा गोळा होत नाही यासाठी निवडणुका पुढे ढकलाव्यात त्या कालावधीत निवडणूक आयोगाला विनंती करुन निवडणुका पुढे ढकलण्यावर चर्चा करण्यात आली असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

सर्वपक्षीय निवडणुकीमध्ये सध्या इम्पेरिकल डेटा गोळा करण्यावर एकमत करण्यात आलं आहे. हा डेटा गोळा होईपर्यंत वेळ जाणार आहे. यामुळे राज्याचे मुख्यसचिव सिताराम कुंटे राज्य मागासवर्ग आयोगासोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेतील. यामुळे आता पुढची कार्यवाही मुख्यसचिव आणि राज्य मागासवर्ग आयागोची असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

निवडणुका घेऊ नका – फडणवीस

राज्य मागास आयोग वर्गाला इम्पेरिकल डेटा जमा करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती भाजपकडून करण्यात आली आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. आजच्या बैठकीत असे ठरले आहे की, राज्य मागास आयोगाला इम्पेरिकल डेटा जमा कऱण्यास सांगण्यात यावे, जोपर्यंत त्यांचे काम पुर्ण होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये. तसेच ज्या जिल्ह्यांतील जागा जास्त कमी होणार आहेत तेथील जागांवर विचार करुन त्या जागा भरुन काढण्यात याव्यात अशी चर्चा केली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


- Advertisement -

हेही वाचा : OBC Reservation : निवडणुका लांबणार, आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठकीत एकमत


 

- Advertisement -