घरताज्या घडामोडीअलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने धोका कमी झाला, विजय वडेट्टीवार यांची माहिती

अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने धोका कमी झाला, विजय वडेट्टीवार यांची माहिती

Subscribe

पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे सगळी धरणं भरली

राज्यात पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसाने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. पावसाच्या पाण्यामुळे धरणे भरली आहेत. अलमट्टी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला असल्यामुळे सांगली, कोल्हापूरमधील धोका कमी झाला आहे. मागील वर्षीच्या पावसाचा अनुभव घेऊन यावेळी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या उपाययोजनांमुळे धोका कमी झाला आहे. यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर, चिपळूण आणि महाडमध्ये मोठे नुकसान झालं आहे. दरड कोसळून अनेक ठिकाणी जिवीतहानी झाली असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला आहे. यावेळी कोयनानगरमध्ये असताना माध्यमांशी संवाद साधला आहे. विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की, यंदा राज्यात सर्व रेकॉर्ड मोडणारा पाऊस पडला आहे. कोयना परिसरात ४८ तासात १ हजार ७२ मिली पावसाची नोंद झाली आहे. आपलं नशीब आणि मागच्या वर्षीच्या पावसाचा अनुभव घेऊन वरिष्ठ मंडळाची बैठक घेऊन यावर दरवर्षी येणारा धोका लक्षात घेऊन उपाययोजना केल्या आहेत. त्यामध्ये जलसंपदा विभागाने महत्वाची भूमिका बजावली आहे. नद्यांच्या उपनद्यांची वरची धरणं ही ५० टक्क्यांपेक्षा भरु नये असा प्रस्ताव दिला होता. त्याबरोबर खालचं जे अलमट्टी धरण आहे ज्याच्यामुळे नेहमी पूर येतो त्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. त्यामुळे अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग १.५० लाखांवरुन तो ३ लाखांवर पोहोचवला आणि धरणामध्ये स्कोप ठेवला गेला यामुळे थोडं संकट कमी झालं आहे.

- Advertisement -

अलमट्टी धरणातून २०१९ मध्ये पाण्याचा विसर्ग कमी झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला फटका बसला होता परंतू यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि पाण्याचा विसर्ग अधिक केल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात जास्त पूर आला नाही. उत्तम नियोजनामुळे अधिक जिवीतहानी झाली नाही. पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे सगळी धरणं भरली आहेत. उत्तम नियोजनासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, नेव्ही, आर्मी अशी पथकांची मागणी करण्यात आली. यामुळे पूर परिस्थितीमधील लोकांना मदत करणं सोयीस्कर झालं असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -