घरताज्या घडामोडीमहाभारत तिकडचंच कौरव कोण, पांडव कोण त्यांनीच ठरवावं, वडेट्टीवारांचा पंकजा मुंडेंना टोला

महाभारत तिकडचंच कौरव कोण, पांडव कोण त्यांनीच ठरवावं, वडेट्टीवारांचा पंकजा मुंडेंना टोला

Subscribe

पाच पांडव का जिंकले कारण त्यांच्याकडे संयम होता.

केंद्रीय मंत्रिमंडळात भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. पंकजा मुंडे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर प्रथमच कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. यावेळी पंकजा मुंडेंनी आपल्या कार्यकर्त्यांना समजावून राजीनामे न देण्याचे आवाहन केलं आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पांडव कौरव यांच्या युद्धाचा उल्लेख केला आहे. यावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी टोला लगावला आहे. कौरव कोण, पांडव कोण त्यांनीच ठरवावा महाभारतही तिकडचंच असल्याचे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलं आहे.

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांना टोला लगावला आहे. कौरव कोण, पांडव कोण हे त्यांनी ठरवावं, त्यांचीच सेना, त्यांचेच कौरव, त्यांचेच पांडव आणि अंगणही त्याचंच आहे. महाभारतही तिकडचंच असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

- Advertisement -

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद साधातना पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे की, पाच पांडव का जिंकले कारण त्यांच्याकडे संयम होता. संयम चांगला असतो आणि तो युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो. मी युद्ध टाळण्याचा प्रयत्न शक्य असेपर्यंत करेल. मी माझ्या वयापेक्षा मोठ्या असलेल्यांचा आदर करते. मी कुणाला भीत नाही कुणाचा निदारा करत नाही तर माणसांचा आदर करते. मला स्वतःसाठी काहीही नको तुमच्यासाठी हवं आहे. पदावर नाही परंतु तुमच्या पालकत्व्याच्या भूमिकेत असून मला कशाचीही आवश्यकता नाही असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

हे असच जाऊ द्यायचं का?

गोपीनाथ मुंडे यांनी मेहनत करुन ऊसाच्या फडातून आणून माणसं जोडली आहेत. त्यांनी कुणाला सभापती बनवलं तर कुणाला मार्केट समितीचा चेअरमन केलंय हे सगळं असच जाऊ द्यायचे का? असा सवाल पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केला तसेच पुन्हा असा प्रयोग करु नका. तुम्ही सगळे माझ्यासाठी महत्त्वाचे आहात फक्त पद मिळवणं हे मुख्य ध्येय नाही. गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पुर्ण करणं हे मुख्य ध्येय आहे. जेव्हा मला वाटेल इथं राम नाही. तेव्हा बघू असा इशाराच पंकजा मुंडे यांनी भाजपला दिला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -