Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Maharashtra Lockdown: राज्यात पूर्णतः लॉकडाऊन करा, वडेट्टीवार आज मुख्यमंत्र्यांना करणार विनंती

Maharashtra Lockdown: राज्यात पूर्णतः लॉकडाऊन करा, वडेट्टीवार आज मुख्यमंत्र्यांना करणार विनंती

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढत असल्यामुळे मिनी लॉकडाऊन आणि वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे आज रात्रीपासून वीकेंड लॉकडाऊन राज्यात लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘परिस्थिती बिकट असल्यामुळे महाराष्ट्रात भविष्यात पूर्णतः  लॉकडाऊन लावण्याची विनंती मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आज करणार आहे.’

नक्की काय म्हणाले विजय वडेट्टीवार? 

‘ज्याप्रमाणे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, त्यामुळे पुढील १० दिवसांमध्ये Active रुग्णांची संख्या १० लाख असण्याची शक्यता आहे. यामुळे अशा परिस्थिती भविष्यात पूर्णतः लॉकडाऊन करावा लागेल. रेल्वेवर निर्बंध आणावे लागतील, गर्दी कुठे होणार नाही हे पाहावे लागेल. ही संपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी किती उपाययोजना केल्यातरी मनुष्यबळ कमी पडणार आहे. डॉक्टर, नर्स कमी पडतील. त्यामुळे हे आणणार कुठून? जे साडे पाच हजार डॉक्टर अंतिम परीक्षा पास देतील. त्यांना आम्ही सेवेत आणणार आहोत. तरी सुद्धा हे देखील कमी पडतील. म्हणून वीकेंडचा लॉकडाऊन नाही तर ३ आठवड्याचा कडक लॉकडाऊन महाराष्ट्रात लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना करणार आहे. कारण आता आपण निरपराध लोकांचे प्राण वाचवू शकत नाही. कोरोनाचा अनोळखी स्प्रेड पसरला आहे. अशा परिस्थितीत पूर्णतः लॉकडाऊन होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आज मी याबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे. ही विनंती काँग्रेसकडून नसून आपती व्यवस्थापन खात्याचा मंत्री म्हणून मी विनंती मुख्यमंत्र्यांना करणार आहे,’ असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

- Advertisement -

पुढे वडेट्टीवार म्हणाले की, ‘राज्यात कोरोनाची स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसऱ्याबाजूला राज्यातील सरकार बदल्यानंतर केंद्र सरकार राज्य सरकारला वेगळीच वागणूक देत आहे. कोरोना लसीची गरज आहे, पण राज्यात लसीचा तुटवडा भासत आहे. गुजरात सारख्या इतर राज्यांना महाराष्ट्रापेक्षा अधिकची लस दिली जाते आणि महाराष्ट्रातले आता लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ आली आहे. मोठ्या प्रमाणात सुरू केलेले लसीकरण मोहीम आता बंद करायला लागत आहे. महाराष्ट्रापेक्षा जास्त इतर राज्यांमध्ये कोरोना लसीचे नुकसान होत आहे. लसी खराब होण्यामध्ये महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर आहे. तरी महाराष्ट्रालाच दोष द्यायचा. महाराष्ट्राच्या मातीशी बेइमानी करायची. हा कुठला न्याय आहे? या काळात विरोधकांनी राजकारण करू नका. महाराष्ट्रातील जनतेचा जीव वाचवण्याची गरज आहे. तुम्ही उपाययोजना सुचवा, आम्ही त्या करू.’


हेही वाचा – मुंबईकरांनो गर्दीमुळे वाढतोय कोरोना, लांब पल्ल्याच्या स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी


- Advertisement -

 

- Advertisement -