घरमहाराष्ट्रVijay Wadettiwar : काँग्रेस पुन्हा नव्याने उभारी घेईल - विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar : काँग्रेस पुन्हा नव्याने उभारी घेईल – विजय वडेट्टीवार

Subscribe

अशोक चव्हाणांसोबत माझे 15-16 वर्षापासूनचे कौटुंबिक संबंध आहेत. आम्ही दोघांनी इंडिया आघाडीच बैठक असेल किंवा नागपूरमधील पक्ष स्थापनेची झालेली बैठक असेल. या जबाबदारी दोघांनी खाद्यांवर घेऊन आम्ही काम केले आहे.

मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या जाण्याने पक्षाला काही फरक पडत नाही. या परिस्थितीतून काँग्रेस पुन्हा नव्याने उभारी घेईल आणि पक्ष मजबुतीने उभा राहिली, असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्ष नेता आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आज काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची मुंबईत बैठक होणार आहे.

अशोक चव्हाण यांच्या पक्ष सोडण्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले, “राजकाणात लोक येत असतात आणि जात असतात. एक व्यक्ती पक्षातून गेल्याने काही फरक पडत नाही. या परिस्थितीतून काँग्रेस पुन्हा नव्याने उभारी घेईल आणि पक्ष मजबुतीने उभा राहिली. माझ्याबाबतही अफवा पसरविण्याचे काम अमरावतीचे रवी राणा यांनी केला आहे, अशा लोकांनी माझे नाव घेऊन काही उल्लेख केला तर, मी एवढेच सांगू इच्छितो की, मी काँग्रेससोबत राहणार आहे. काँग्रेसने मला खूप काही दिलेले आहे. मी चार विधानसभा निवडणुका काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढलो आणि जिंकलो. मंत्री, कॅबिनेटमंत्री आणि दोन वेळा विरोधी पक्षनेता केला.  मला एवढे भरभरून दिल्यानंतर आता मला पक्षाकडून फार काही अपेक्षा नाही. मी शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहूनच विचारधारेसोबत काम करणार असा निर्धारही केला आहे”, असे ते म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Ashok Chavan : ‘आदर्श’सह बुलढाणा अर्बन कर्ज घाटोळा; ‘हे’ आहे काँग्रेस सोडण्याचे कारण!

अशोक चव्हाणांसोबत कौटुंबिक संबंध

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल असेलेल्या असंतोषामुळे अशोक चव्हाण पक्ष सोडून गेल्याची चर्चा सुरू आहे? या प्रश्नावर विजय वडेट्टीवार म्हणाले, “यासंबंधात प्रभारींची चर्चा झाल्यानंतर काही गोष्टी असतील तर, त्या पुढे येतील. अशोक चव्हाणांसोबत माझे 15-16 वर्षांपासूनचेकौटुंबिक संबंध आहेत. आम्ही दोघांनी इंडिया आघाडीची बैठक असेल किंवा नागपूरमधील काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिनाची बैठक असेल. ही जबाबदारी दोघांनी खाद्यांवर घेऊन आम्ही काम केले आहे. पण संबंध वेगळे आणि पक्षाची विचारधारा वेगळी आहे. अशोच चव्हाण पक्ष सोडून का केले हे तेच सांगू शकतील. प्रदेशाध्यक्षबाबत मला फार काही माहिती नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -