घरमहाराष्ट्रमला वाटलं महसूल खातं देतील पण...; वडेट्टीवारांची खदखद, नाना पटोलेंचं स्पष्टीकरण

मला वाटलं महसूल खातं देतील पण…; वडेट्टीवारांची खदखद, नाना पटोलेंचं स्पष्टीकरण

Subscribe

राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या मंत्रीपदाबाबतची खदखद ओबीसी परिषदेत व्यक्त केली. पंकजा मुंडे यांनाही ग्रामविकास खातं भेटलं होतं. तेव्हा मी विरोधी पक्ष नेता होतो. ओबीसीचं नेतृत्व करतो. मला वाटलं महसूल खातं मिळेल, पण हे खातं भेटले. कारण मी ओबीसी आहे, अशी खंत वडेट्टीवार यांनी बोलून दाखवली.

माझ्याकडे जेव्हा ओबीसी खातं दिलं तेव्हा चपरासी सुद्धा नव्हता. मंत्रालय स्टाफ नाही, निधी नाही आहे, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे वारंवार फॉलोअप घ्यावा लागला. ओबीसी खात्यात जागा भरण्यासाठी पैसे नाही म्हणतात. कार्यालयालाही जागा नाही. समाज कल्याणच्या भरवशावर ओबीसी खाते चालवतोय अशी खदखद विजय वडेट्टीवार यांनी जाहीरपणे बोलून दाखवली.

- Advertisement -

प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं स्पष्टीकरण

विजय वडेट्टीवार यांनी जाहीरपणे खंत व्यक्त केल्याने सरकारमध्ये आणि काँग्रेसमध्ये धुसफूस सुरु असल्याच्या चर्चा सकाळपासून सुरु झाल्या. दरम्यान, आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर यापुढील काळात अन्याय होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. काँग्रेस पक्षात कोणतीही धुसफूस नाही आहे. वरिष्ठ नेते म्हणून बाळासाहेब थोरात यांना महसूल खातं देण्यात आलं, असं नाना पटोले म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -