Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रVijay Wadettiwar : निवडणुकीच्या आकडेवारीवर संशय व्यक्त करताना वडेट्टीवारांनी दिला 2019, 2014...

Vijay Wadettiwar : निवडणुकीच्या आकडेवारीवर संशय व्यक्त करताना वडेट्टीवारांनी दिला 2019, 2014 चा दाखला

Subscribe

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तर 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकींचा दाखला देताना या निकालावर संशय व्यक्त केला आहे. तर, लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली या सरकारने कोणता वेगळा खेला तर केला नाही ना, असाही प्रश्न वडेट्टीवारांनी उपस्थित केला.

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालाने सर्वांनाच धक्का दिला आहे. महायुतीने तब्बल 230 जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीला पाणी पाजले आहे. एक्झिट पोल व राजकीय विश्लेषकांचे, तज्ज्ञांचे अहवालही या निकालासमोर सपशेल अपयशी ठरले आहे. पण विधानसभा निवडणुकीच्या निकालावर महाविकास आघाडीकडून शंका उपस्थित करण्यात येत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तर 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकींचा दाखला देताना या निकालावर संशय व्यक्त केला आहे. तर, लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली या सरकारने कोणता वेगळा खेला तर केला नाही ना, असाही प्रश्न वडेट्टीवारांनी उपस्थित केला. (Vijay Wadettiwar gave proof of 2019, 2014, doubting the election data)

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी (ता. 25 नोव्हेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सुरुवातीलाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्याविषयी विचारणा करण्यात आली. याबाबत ते म्हणाले की, मला आता याबाबत अशी कोणतीही माहिती मिळालेली नाही. आता त्यांची भूमिका काय आहे, त्याची मी माहिती घेत आहे. सध्या मला पूर्ण माहिती नाही, असे वडेट्टीवारांकडून स्पष्ट करण्यात आले. तर निवडणुकीच्या निकालाबाबत भाष्य करताना ते म्हणाले की, सरकारच्या विरोधात लोकांचा एवढा आक्रोश असताना लाडकी बहीणच्या नावाने पाच टक्के मते फिरलीही असतील का? लाडकी बहीण योजनेला समोर करून यांनी दुसरा प्रयोग तर केला गेला नाही ना? असा प्रश्न जनतेलाही पडला असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा… Maharashtra Election Results 2024 : राज्यात शिरपूरच्या पावरांना सर्वाधिक मताधिक्य; तर या 15 उमेदवारांना मोठे यश

तसेच, 2014 मध्ये मोदी लाट होती. त्यावेळी आम्ही 42 जागा जिंकल्या होत्या. 2019 मध्ये पुलवामा सारख्या घटना घडल्या. त्यावेळी दोन आकड्यांपर्यंत काँग्रेस जाणार नाही, असे सांगितले गेले. आम्ही 44 जागा जिंकल्या. आता आम्हाला 16 जागा मिळाल्या. सरकारच्या विरोधात वातावरण होते. त्यानंतर आम्हाला अपयश आहे. त्यामुळे आताच असे कसे झाले? असा प्रश्न लोकांना पडला आहे. पण सत्ताधाऱ्यांना विरोधक संपवायचे आहेत, असे म्हणत वडेट्टीवारांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी पक्षाकडून जी जबाबदारी देण्यात येईल, ती मी व्यवस्थित पार पडेल व आदेश देईल तोसुद्धा प्रामाणिकपणे पाळली जाईल ,असे सांगून त्यांनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यास इच्छुक असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले.


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -