घरमहाराष्ट्रVijay Wadettiwar : पोलिसांच्या पत्नींना आंदोलनाचा इशारा द्यावा लागणे म्हणजे...; वडेट्टीवारांचा हल्लाबोल

Vijay Wadettiwar : पोलिसांच्या पत्नींना आंदोलनाचा इशारा द्यावा लागणे म्हणजे…; वडेट्टीवारांचा हल्लाबोल

Subscribe

अकोल्याच्या सभेत बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की, पोलीस आमच्या राज्यात आहेत, आमच्यावर काय कारवाई करणार? त्यांना जागेवर राहायचे आहे की नाही? ते माझ्या भाषणाचे चित्रीकरण करून केवळ बायकोला दाखवू शकतील. पोलीस माझे काहीही बिघडवू शकत नाहीत, असे वादग्रस्त विधान भाजपा आमदार नितेश राणे यांनी अकोल्यातील सभेत केले होते.

मुंबई : भाजपा आमदार नितेश राणे हे हिंदू जनआक्रोष मोर्चाच्या निमित्ताने राज्यभर आंदोलन करुन सभा घेत आहेत. सोलापूरसह अकोल्यात त्यांनी पोलिसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी पोलीस पत्नींनी पोलिसा आयुक्तांकडे जाऊ तक्रारीची मागणी केली. याप्रकरणी विरोधी पक्षनेते वडेट्टीरांनी सरकारवर निशाणा साधला. (Vijay Wadettiwar Having to warn police wives to protest means Attack of the Wadettivars)

अकोल्याच्या सभेत बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की, पोलीस आमच्या राज्यात आहेत, आमच्यावर काय कारवाई करणार? त्यांना जागेवर राहायचे आहे की नाही? ते माझ्या भाषणाचे चित्रीकरण करून केवळ बायकोला दाखवू शकतील. पोलीस माझे काहीही बिघडवू शकत नाहीत, असे वादग्रस्त विधान भाजपा आमदार नितेश राणे यांनी अकोल्यातील सभेत केले होते. त्याआधी सोलापूरमधील सभेत आमचा बॉस सागर बंगल्यावर बसतो त्यामुळे पोलीस माझं काहीही बिघडवू शकत नाहीत असेही आमदार नितेश राणे यांनी विधान केलं होतं. याप्रकरणी आज 24 फेब्रुवारी रोजी वरळीतील पोलीस वसाहतीतील पोलीस पत्नींनी पोलीस आयुक्तांकडे जाऊन तक्रार नोंदवत आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या तक्रारपत्राची प्रत महिलासुद्धा देण्यात आली आहे.

- Advertisement -

विजय वडेट्टीवारांनी साधला सरकारवर निशाणा

पोलीस पत्नीनी पोलीस आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीनंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X वर पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिले की, महिलांचा अपमान कुठे केला विचारणाऱ्या भाजपा आमदाराविरोधात पोलिसांच्या पत्नींनी आज मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Deepak Kesarkar : जरांगेंनी समाजाच्या सहानुभूतीचा विचार करावा; दीपक केसरकरांचा सल्ला

महिलांची सुरक्षा आणि सन्मानाबाबत… 

पुढे पोस्टमध्ये लिहिले की, भाजप आमदार सतत पोलिसांचे खच्चीकरण करतात, त्या पुढे जाऊन त्यांच्या पत्नीबद्दल बोलतात. कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा आज पोलिसांच्या पत्नींना द्यावा लागतो यातून राज्यात पोलिसांची आणि कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे हे राज्यातील जनतेला दिसत आहे. ज्या राज्यात पोलिसांच्या पत्नींना खालच्या भाषेत सत्ताधारी भाजपा आमदार बोलत असतील तिथे इतर महिलांची सुरक्षा आणि सन्मानाबाबत काय स्थिती असेल हे अंदाज न घेतलेला बरा. अशा शब्दांत वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -