Homeमहाराष्ट्रVijay Wadettiwar On BJP : 'या' सरकारमध्ये सर्वाधिक नुकसान हिंदूंचेच - वडेट्टीवार

Vijay Wadettiwar On BJP : ‘या’ सरकारमध्ये सर्वाधिक नुकसान हिंदूंचेच – वडेट्टीवार

Subscribe

सरकारने तातडीने पंचनामे करून त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे. सरकारने धान उत्पादनकांचे पैसे लवकर द्यावे", अशी मागणी विधानसभेचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

मुंबई : भाजपा केवळ हिंदू मतांसाठी माथी भडकवत आहे. या सरकारमध्ये सर्वाधिक नुकसान हे हिंदूंचेच झाले आहे, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. राज्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिठीमुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी राज्य सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.

भाजपाचे हिंदूत्व हे घरे पेटवणार आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. यावर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया देत म्हणाले, “भाजपाचे हिंदूत्व कुठे आहे. राजकारणासाठी भाजपाचे हिंदूत्व आहे. हिंदूसाठी भाजपाचे हिंदूत्व नाही. त्यामुळे भाजपा हे त्यांच्या सोयीनुसार धर्माचा वापर करत आहे. मग तुम्ही मेलात काय आणि गेलात काय? याच्याशी भाजपाला काही देणे घेणे नाही. आज या सरकारमध्ये सर्वात जास्त कोण उद्धवस्त झाला असेल, तर तो हिंदूच आहे आणि हे सत्य आहे. त्यामुळे हिंदूची घरे उद्धवस्त करणे. केवळ हिंदूच्या मतासाठी वापर करणे त्यांची माथी भडकवत आहेत आणि त्यांना उद्धवस्त करून स्वत:ची पोळी भाजणे, एवढेच काम भाजपा करत आहे”, असा आरोपही विजय वडेट्टीवार केले आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये; असा असणार दौरा

अवकाळी पाऊस आणि गारपिठीमुळे रब्बी पिकांचे झालेल्या नुकसनावर विजय वडेट्टीवार म्हणाले, “गारपीठ आणि अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. यात चणा, वाटाणा, मुग, गहू या सर्व पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तातडीने या सर्वांचे सर्वेक्षण तयार करण्याची मागणीही करत आहोत, अशी माहिती त्यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आहे.

हेही वाचा – Rajan Salvi : राजन साळवी यांची स्वत:साठी नाहीतर कुटुंबीयांसाठी उच्च न्यायालयात धाव; ‘हे’ आहे कारण

धान उत्पादकांचेही पैसे लवकर द्या

विजय वडेट्टीवार म्हणाले, “या राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. या काळात शेतकऱ्यांच्या जास्त आत्महत्या झाल्या आहेत. या अवकळी पाऊस आणि गारपिठीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान होणार आहे. फक्त शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, असे फक्त म्हणून चालणार नाही. सरकारने तातडीने पंचनामे करून त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे. सरकारने धान उत्पादकांचे पैसे लवकर द्यावे”, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.