घरमहाराष्ट्रVijay Wadettiwar 'त्या' कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची चौकशी झालीच पाहिजे; वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Vijay Wadettiwar ‘त्या’ कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची चौकशी झालीच पाहिजे; वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Subscribe

उल्हासनगरमध्ये झालेल्य़ा गोळीबारानंतर महायुती सरकारमध्ये विसंवाद आहे, हे समोर आलेलं आहे, वडेट्टीवारांचा सरकारवर ह्ललाबोल

मुंबई: उल्हासनगर येथील हिललाइन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना (शिंदे गट)नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. याप्रकरणी पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे. जमिनीचा वाद आणि आपापसांतील वैमनस्य यातून हा प्रकार घडला आहे. या घटनेवरून सध्या राजकीय आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरच हल्लाबोल केला आहे. (Vijay Wadettiwar That crores of rupees transaction must be investigated Vijay Wadettiwar s attack on the Chief Minister Eknath Shinde )

वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?

उल्हासनगरमध्ये झालेल्य़ा गोळीबारानंतर महायुती सरकारमध्ये विसंवाद आहे, हे समोर आलेलं आहे. या युतीत एक शीतयुद्ध सुरू होतं, ज्याचं रुपांतर आता य़ुद्धात झालं आहे, आता हे प्रकरण एका व्यक्तीचा जीव घेण्यापर्यंत पोहोचलं आहे, असं म्हणत वडेट्टीवारांनी सरकारला घेरलं आहे.

- Advertisement -

ईडी केवळ विरोधकांसाठी आहे का?

राज्यातील अनेक नेते सध्या ईडीच्या कार्य़ालयात आपल्या चपला झिजवत आहेत, यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, ईडी केवळ विरोधकांसाठी आहे का? तसंच, भाजपा आमदार गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपले करोडो रुपये असल्याचा केलेला आरोप हा अतिशय गंभीर आहे, त्याची चौकशी झालीच पाहिजे, असंही वडेट्टीवार म्हणाले.

आमदार गणपत गायकवाड यांचे मुख्यमंत्र्यांवर आरोप-

या गंभीर घटनेनंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही आरोप केले. जर मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे हेच राहणार असतील, तर महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढून गुंडाराज येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी गायकवाड यांनी केली. त्याचवेळी माझ्यावर होणारा अन्याय मी आमचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांना वारंवार सांगितला होता. परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. पक्षश्रेष्ठींनी माझी दखल घेतली नाही. कल्याण पूर्वेत शिंदे बापलेक माझ्यावर अन्याय करत राहिले. माझे करोडो रुपये एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. त्यांनी ते परत केले नाहीत, असा आरोपही गायकवाड यांनी केला आहे.

- Advertisement -

(हेही वाचाछAjit Pawar Vs Awhad : एसटी आणि ट्रेनने फिरतात काय? आव्हाडांचा अजित पवारांना खोचक सवाल )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -