घरमहाराष्ट्रVijay Wadettiwar : राज्य सरकार भांबावलेले, प्रथा आणि परंपरा मोडीत काढल्या; वडेट्टीवारांची...

Vijay Wadettiwar : राज्य सरकार भांबावलेले, प्रथा आणि परंपरा मोडीत काढल्या; वडेट्टीवारांची टीका

Subscribe

मुंबई : राज्य सरकार भांबावलेले आहे. या सरकारने सर्व प्रथा आणि परंपरा मोडीत काढलेले आहेत, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी राजय सरकारवर केली आहे. राज्य सरकारने मराठा समजाला आरक्षण देण्यासासाठी विधिमंडळाचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलविले आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणावर विधेयक मांडले जाणार असून या विधेयकावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात चर्चा होणार आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, “राज्य सरकारला प्रथा परंपरा यांची जान राहिलेली नाही. यापूर्वी गट नेत्याची बैठक घेऊन त्यावर सर्वांचे एकमत करून घेण्यासाठी प्रयत्न केला असता. पण सरकारने त्या मसुद्यावर काही प्रकाश टाकता आला असता आणि समन्वयाने मराठा समाजाला न्याय देता आला असता. पण या सरकारने उलटे काम केले आहे. आधी राज्यपालांची बैठक, महादोयाचे भाषण आणि त्यानंतर गटनेत्याची बैठक त्यामुळे मला वाटते की, सरकारला विरोधकांना विश्वासात घेऊन काम करायचे नाही, अशी एकूण सरकारची परिस्थिती दिसत आहे. एकूण हे भांबावलेले सरकार आहे. आणि त्यांना सर्व प्रथा आणि परंपरा सरकारने मोडीत काढलेला आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – INDIA : युपीतील दोन जागांवरून काँग्रेस-सपाचे घोडे अडले! राहुल गांधींच्या यात्रेपासून अखिलेश दूर

फक्त जरांगेंचेच ऐकणार का? भुजबळांचा सवाल

मराठ्यांना 50 टक्केच्या आत आरक्षण द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मनोज जरांगेच्या मागणीवर छगन भुजबळ म्हणाले, “ते जर करायचे असेल तर मग कायदा कशाला करायचा. मनोज जरांगे सांगत आहे. त्याचप्रमाणे सर्व करायचे असेल तर, जरांगे म्हणतो की, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्या. मग वेगळा कायदा करण्याची गरज काय ? सरकार कायदा करत आहे याचा अर्थच असा की मराठा समाजाला वेगळे आरक्षण समाजाला देण्याचा सरकारचा स्पष्ट उद्दिष्ट आहे.”

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -