घरमहाराष्ट्रनागपूरVijay Wadettiwar : शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं असताना सरकार 'शासन आपल्या दारी'चा डंका...

Vijay Wadettiwar : शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं असताना सरकार ‘शासन आपल्या दारी’चा डंका पिटतंय

Subscribe

नागपूर : हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यााधी होणाऱ्या आजच्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे. मात्र अधिवेशनापूर्वी पत्रकार परिषद घेत विरोधकांनी सरकारला कात्रीत पडकण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं असताना सरकार शासन आपल्या दारीच्या माध्यमातून डंका पिटतोय, अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. (Vijay Wadettiwar While the backs of the farmers are broken the government is shasan aplya dari)

विजय वडेट्टीवर म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आत्महत्या शेतकऱ्यांच्या झाल्या आहेत, अशी माहिती आताच NCRFच्या अहवालातून आपल्या सगळ्यांसमोर आलेली आहे. गरिबी, बेरोजगारीमुळे जगणं आता या राज्यामध्ये कठीण झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची अहवालात स्पष्टपणे नोंद केली आहे. महाराष्ट्रात एका वर्षामध्ये बावीस हजार सातशे सेहेचाळीस शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याची नोंद NCRFच्या अहवालामध्ये पाहायला मिळते. कर्जबाजारीपणाच्या विळख्यात अडकून आणि दिवाळखोरीमुळे आत्महत्या संख्येमध्ये ही वाढ होताना दिसते आहे. शेती क्षेत्रामध्ये तर दर एक तासाला एकापेक्षा जास्त शेतकरी आणि शेतमजूर आत्महत्या करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Vijay Wadettiwar : उपराजधानीमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा बट्टाबोळ…; अधिवेशनापूर्वी वडेट्टीवार कडाडले

NCRF, army आणि NCRBच्या आकडेवारीनुसार 2022 वर्षात राज्यात सगळ्यात जास्त आणि नागपूरमध्ये 2503 चोरीच्या गुन्ह्यांची नोद राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालात समोर आली आहे. खुनाच्या घटनेत महाराष्ट्र तिसरा क्रमांकावर आणि बलात्काराच्या घटनेत चौथ्या क्रमांकावर आहे. धक्कादायक म्हणजे सायबर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे.

- Advertisement -

गेल्या चार वर्षांपासून शेतकरी राज्यामध्ये अवेळी झालेला अवकाळी पाऊस आणि दुष्काळी परिस्थितीमुळे सातत्याने झुंजतो आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आता अश्रू आहेत. कारण सोयाबीन आणि कापसाचं पीक गेलं आहे. विदर्भातील धान आणि सतरा या पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याचं कंबरडं मोडलेलं आहे. नुकसानभरपाई म्हणून शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत.

हेही वाचा – Winter Session : चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार; शंभरहून अधिक मोर्चे विधिमंडळावर धडकणार

शेतकरी सन्मान योजनेचा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला होता. परंतु पन्नास हजार रुपयाचा निधी मदत म्हणून शेतकऱ्यांच्या पदरात अद्यापही पडलेली नाही. एकीकडे महाराष्ट्रातील शेतकरी उध्वस्त होत असताना सरकार शासन आपल्या दारी या योजनेचा मोठी कार्यक्रम करताना दिसतो आहे. बीडमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या आहेत. पाणी टंचाई व अवकाळी पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं असताना करोडो रुपये शासनाच्या तिजोरीतून खर्च करून सरकार शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून डंका पिटण्याचं काम करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -