घरमहाराष्ट्रVijay Wadettiwar : "अशा व्यक्तींकडून काय अपेक्षा ठेवायची?" सिद्दीकींच्या राजीनाम्यावर वडेट्टीवारांची टीका

Vijay Wadettiwar : “अशा व्यक्तींकडून काय अपेक्षा ठेवायची?” सिद्दीकींच्या राजीनाम्यावर वडेट्टीवारांची टीका

Subscribe

स्वतःचे पाप लपवण्यासाठी जर का कोणी पक्षातून बाहेर पडत असेल तर अशा व्यक्तींकडून काय अपेक्षा ठेवायची? अशी टीका विजय वडेट्टीवार यांना बाबा सिद्दीकी यांच्या राजीनाम्यावर केली आहे.

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ज्यामुळे लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेस पक्षाला महिन्याभरात दुसरा धक्का मिळाला आहे. कारण महिन्याभरापूर्वी दक्षिण मुंबईचे काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत शिंदेंच्या नेतृत्वात शिवधनुष्य हाती घेतले होते. ज्यामुळे आता काँग्रेसमध्ये मुंबईत फूट पडू लागली आहे का? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. परंतु, आता बाबा सिद्दीकी यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. स्वतःचे पाप लपवण्यासाठी जर का कोणी पक्षातून बाहेर पडत असेल तर अशा व्यक्तींकडून काय अपेक्षा ठेवायची? असा टोला वडेट्टीवारांनी सिद्दीकी यांना लगावला आहे. (Vijay Wadettiwar’s criticism of Baba Siddique resignation)

हेही वाचा… Baba Siddique : मुंबईत काँग्रेस फुटीच्या वाटेवर? मिलिंद देवरांनंतर बाबा सिद्दीकींनी हाताची साथ सोडली

- Advertisement -

बाबा सिद्दीकी यांच्या राजीनाम्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, या लोकांसाठी सत्ता आणि संपत्ती सर्वोच्च आहे. ते सत्तेसाठी गेलेले आहेत. यांना काही विचार नाही, आयडॉलॉजी नाही, लोकांचे हित नाही. अधिकाधिक काय मिळवता येईल, हा उद्देश ठेवून ही मंडळी फुटलेली आहेत. चौकशीच्या फेऱ्यातून मुक्ती मिळावी, याच उद्देशाने ते फुटले आहेत. स्वत:चे पाप लपवण्यासाठी फुटले आहेत. अशा व्यक्तींकडून काय अपेक्षा ठेवायची? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तर ते ( बाबा सिद्दीकी) धर्मांध पक्षात जात आहेत. ते अजित पवार यांच्या पक्षात जात असले तरी ते (अजित पवार) भाजपाच्या इशाऱ्यावर चालणारे बाहुले आहेत, असा टोला विजय वडेट्टीवारांनी लगावला.

यावेळी वडेट्टीवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. एकनाथ शिंदे आणि अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतर त्यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू झाले. या शीतयुद्धाचे रुपांतर त्यानंतर शस्त्राच्या युद्धात झाले. आता या दोन्ही पक्षांकडून शस्त्र उगारण्यात येत आहेत. भविष्यात हे दोन्ही एकमेकांवर बॉम्ब टाकूनही मोकळे होतील, अशी टीका वडेट्टीवारांनी केली आहे. परंतु, आता वडेट्टीवारांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर साधलेल्या निशाण्याला कोणी सत्ताधारी प्रत्युत्तर देते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर 10 फेब्रुवारीला सिद्दीकी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. याची पक्ष प्रवेशाची बॅनरबाजी वरळीत करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -