घरमहाराष्ट्रनाशिकपुणे विद्यापीठ 'सिनेट'वर विकास मंचची सत्ता;नाशिकचे सोनवणे, वैद्य विजयी

पुणे विद्यापीठ ‘सिनेट’वर विकास मंचची सत्ता;नाशिकचे सोनवणे, वैद्य विजयी

Subscribe

नाशिक : देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये आग्रस्थानी असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीधर अधिसभा अर्थात ‘सिनेट’ निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचचा झेंडा फडकला आहे. या पॅनलमधील आठ उमेदवार पहिल्याच फेरीत विजयी झाले. तर दोन जागांसाठी रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरु होती. विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये नाशिकचे विजय सोनवणे व सागर वैद्य हे विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत.

सीनेट निवडणुकीसाठी विद्यापीठ विकास मंचसह महाविकास आघाडी आणि छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनलमध्ये लढत रंगली. मंगळवारी (दि.22) विद्यापीठ प्रांगणात मतमोजणीस प्रारंभ झाला. निवडणुकीत विजयी होण्यासाठी 3 हजार 654 इतका मतांचा कोटा ठरवण्यात आला. पहिल्या फेरीतच विजय सोनवणे व सागर वैद्य यांनी हा कोटा पूर्ण केल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू प्रसेनजित फडणवीस हे विजयी झाले. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांना संघर्ष करावा लागला होता. अनुसूचित जाती गटातील उमेदवार राहुल पाखरे, अनुसूचित जमातीचे उमेदवार गणपत नागरे, महिला राखिव गटाच्या बागेश्री मंठाळकर, ओबीसी प्रवर्गातून सचिन गोर्डे हे विजयी झाले. खुल्या प्रवर्गातील एकूण पाच जागांपैकी दोन जागांसाठी रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरु होती. यात संतोष ढोरे व युवराज नरवडे यांचा समावेश आहे.

कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला विजयी करण्यासाठी सर्व शिक्षण संस्था, नेते, पक्ष एकत्र आल्याचा आनंद आहे. यशाचे श्रेय अभाविपचे नेते राजेश पांडे, डॉ.राजेंद्र विखे, डॉ.गजानन एकबोटे, अ‍ॅड.नितीन ठाकरे, डॉ.अपूर्व हिरेंसह कार्यकर्त्यांचे आहे. : सागर वैद्य, विजयी उमेदवार

कोरोनाकाळातील शुल्क कपातीच्या संदर्भातील निर्णय असो किंवा कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या पाल्यांची संपूर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णय, यामुळे मतदारांनी पुनश्च संधी दिली. यापुढे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण योग्य रीतीने अमलात आणण्यासाठी कटिबद्ध आहे. रोजगार हमीमुख शिक्षण शिकवू उमेदवारी व निवड योजनेच्या विकासाला मी गती देणार आहे. विद्यापीठात अद्यावत क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी आणि खुले विद्यार्थी निवडणूक सुरू करणार आहोत. : विजय सोनवणे, विजयी उमेदवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -