घरमहाराष्ट्रविखे पाटील आता पक्ष विरोधी नेते

विखे पाटील आता पक्ष विरोधी नेते

Subscribe

बाळासाहेब थोरातांचा घणाघात

राधाकृष्ण विखेपाटील हे विरोधी पक्षनेते नाही, तर पक्ष विरोधी नेते आहेत, अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शिर्डीतील आघाडीच्या पहिल्याच प्रचारसभेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना टोला लगावला.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात थोरातांनी आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. संगमनेर तालुक्यातील निझर्णेश्वरमध्ये आयोजित विजय निर्धार सभेत ते बोलत होते.

- Advertisement -

ज्यांच्यावर पक्षाने जबाबदारी दिली, तेच चुकीचे वागत आहेत, असं म्हणत थोरातांनी विखेंना घरचा आहेर दिला. विधानसभेत भाषण झालं का विरोधी पक्षनेते मुख्यमंत्र्यांच्या दालनात असायचे, असा दावाही थोरातांनी केला.

शिर्डी विधानसभेतील जनताही काँग्रेसच्या पाठीशी उभी राहील. विरोधी पक्षनेते आज या व्यासपीठावर पाहिजे होते. ते काँग्रेसला ताकद देण्याऐवजी ताकद दाखवायचं आव्हान देत आहेत, अशा शब्दांत बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटलांवर घणाघाती टीका केली. विखे आणि थोरात यांच्यातील वाद नवीन नाही. सुजय विखेंचा निर्णय वैयक्तिक नाही. काँग्रेसने एखाद्या कुटुंबाला किती दिलं, हा विचार केला तर सर्वात जास्त विखे कुटुंबाला दिलं आहे, असं थोरात म्हणाले होते. सगळ्याच पक्षांमध्ये मतभेद आणि मतमतांतरे असतात. मात्र यावेळची निवडणूक विचारधारेची असून आपापसांतील मतभेद विसरले गेले पाहिजे आणि सरकार घालविण्याचा मुख्य उद्देश डोळ्यांसमोर ठेऊन काँग्रेस पक्षातील सर्वांनी एकत्रित काम केलं पाहिजे, असं थोरात मागच्या वेळी म्हणाले होते.

- Advertisement -

गडकरी इंदूरमधून लढण्याच्या तयारीत
भाजपचे वजनदार नेते नितीन गडकरी यांचा नागपूर लोकसभा निवडणुकीत पराभव होण्याची शक्यता लक्षात घेऊन ते सुरक्षित इंदूरमधून निवडणूक लढवतील, असे थोरात यांनी म्हटले आहे. तालुक्यातील निझर्णेश्वर येथे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. नागपूरमधून गडकरी मोठ्या मताधिक्याने निवडून येणार, अशी राज्यभर चर्चा होती. पण ते गडगडणार आहेत. विदर्भात सर्वच जागांवर काँग्रेस आघाडीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास आमदार थोरात यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -