घरमहाराष्ट्रविखे पाटील भाजप सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार?

विखे पाटील भाजप सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार?

Subscribe

विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजप पक्षात प्रवेश करणारे राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा सुरु आहे. त्यामागे कारणही अगदी तसेच आहे. सध्याच्या घडीला अहनदनगर जिल्ह्यातील राज्यातील घडामोडींना वेगळे वळण लागले आहे. नगर जिल्ह्याच्या स्थानिक भाजप नेत्यांकडून विखे पिता-पुत्रांवर टीका केली जात आहे. त्यामुळे या वादविदांना कंटाळून विखे पाटील पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा – भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; विखे-शिंदे बैठकीत समोरासमोर

- Advertisement -

विखे पाटील आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटले?

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागपुरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली होती. नागपूरच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये खर्गे आणि विखे पाटील यांच्यात बैठक झाल्याची चर्चा सुरु होती. मात्र, खर्गे यांनी या वृत्ताला फेटाळले आहे. विखे पाटील आणि आपली कोणत्याही प्रकारची भेट झाली नसल्याचे ते म्हणाले आहेत.

विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करुन भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा विजय झाला. मात्र, या निवडणुकीत नगर जिल्ह्यात भाजपला हवे तसे यश मिळाले नाही. विशेष म्हणजे माजी मंत्री राम शिंदे यांचा देखील या निवडणुकीत पराभव झाला. २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या नगर जिल्ह्यात ४ जागा जिंकून आल्या होत्या. मात्र, २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या फक्त ३ जागा जिंकून आल्या.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीत भाजपला नगर जिल्ह्यात अपयश आल्यामुळे तेथील स्थानिक भाजप नेत्यांनी विखे पाटील पिता-पुत्रांवर निशाना साधला. विखे पाटील यांच्यावर पाडापाडीच्या राजकारणाची टीका करण्यात आली. अखेर शुक्रवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत या संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही बाजूंच्या भूमिका ऐकूण घेण्यात आल्या. या प्रकरणी विजय पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती याप्रकरणावर निर्णय देणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -