घरताज्या घडामोडीआरक्षणाच्या मुददयावर एकाच व्यासपीठावर यावं, विखे पाटलांचे संभाजीराजेंना आवाहन

आरक्षणाच्या मुददयावर एकाच व्यासपीठावर यावं, विखे पाटलांचे संभाजीराजेंना आवाहन

Subscribe

मराठा आरक्षणाच्या मुददयावर राज्यातील सर्व संघटनांनी, सर्व नेत्यांनी एकत्रित येणे आवश्यक आहे. याकरीता मी सर्व संघटनांशी चर्चा करतोय. लवकरच छत्रपती संभाजीराजें आणि विनायक मेटे यांच्याशी शीही मी चर्चा करून सर्व संघटनांसोबत एका व्यासपीठावर येण्याची विनंती मी त्यांना करणार असल्याचे भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. राज्यात 23 संघटना काम करत आहेत, मग भूमिका वेगळी का? असा सवालही विखे-पाटील यांनी उपस्थित केलाय.

मराठा आरक्षणाच्या मुददयावर नाशिक येथे आयोजित बैठकीप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी विखे पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मुददयावर सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रदद केल्यानंतर समाजबांधवांमध्ये मोठा असंतोष आहे. त्यामुळे आरक्षण मिळविण्यासाठी कशा पध्दतीने पुढे जायला हवं याबाबत सर्वांशी चर्चा करत आहोत. नाशिकमध्ये आज यासंदर्भात बैठक घेतली आणि बैठकीतील निर्णय पक्षाला कळविण्यात येईल. या बैठकीला सर्व संघटनांना आमंत्रित करण्यात आले होते. सर्वांची मतंही यवेळी जाणून घेण्यात आल्याचे ते म्हणाले. परंतु मराठा आरक्षणाची लढाई जिकांयची असेल तर सर्व संघटनांच्या नेत्यांनी एकाच व्यासपीठावर यावे असे माझे मत आहे. यासाठी एक बैठक लोणीला झाली. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन ही माझी भुमिका आहे. मराठा आरक्षणाच्या मुददयावर राजयभरात २२ ते २३ संघटना कार्यरत आहेत. या संघटना जर एका व्यासपीठावर आल्या तर आंदोलनात ही जी विसंगती येत चालली आहे ती दूर होईल आणि सामुहिक प्रयत्नांनी हा प्रश्न सुट शकेल असे मला वाटते. राज्य सरकार समाजात फूट पाडून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे. आपण आज किंवा उद्या संभाजीराजे यांच्याशी चर्चा करणार आहोत. आपली भूमिका ही समन्वयाची आहे. संभाजीराजे यांना आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती आपण करु. सगळे एकत्र येऊन आठवड्याभरात बैठक घेऊ. कोणत्याही आंदोलनाचं नेतृत्व सामुदायिक असावं, असं विखे पाटील यावेळी म्हणाले. संभाजीराजे यांनी राज्यातील संघटनांच्या बैठकीला यावं, अशी विनंती आपण त्यांना करणार आहोत. समाजाचा दबाव वाढला की नेते मंडळी पुढे येतील, असा दावाही विखेंनी यावेळी केलाय. मोर्चाचे नेतृत्व कोणी करावे याबाबत विचारले असता ते म्हणाले की, व्यक्तिगत प्रतिष्ठेचा प्रश्न कोणाचाच नाही. आरक्षण मिळावे ही सर्वांची भुमिका आहे. याबाबत लवकरच सर्व संघटनांनी एकत्रित बैठक घेवून निर्णय घेऊ असे ते म्हणाले.

- Advertisement -

… काँग्रेसने सत्तेतून बाजूला व्हावे
सरकारमध्ये विसंवाद दिसून येतो आहे. प्रत्येकजण वेगळी भुमिका मांडतोय. आता काँग्रेस पक्ष इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करत आहे. तुम्ही राज्यात ज्या सरकारमध्ये सत्तेत आहात त्या सरकारने इंधनावरील कर जरी कमी केले तरी आपल्याला यश येईल असा टोला त्यांनी लगावला. प्रत्येकवेळी केंद्राकडे बोट दाखवणार असाल तर मग सत्तेतून बाजूला व्हा असे आव्हानच त्यांनी दिले.

काय म्हणाले विखे पाटील…
* मराठा आरक्षणासाठी सर्व नेत्यांनी एकाच व्यासपीठावर यावं
* सामुदायिक नेतृत्वानेच हा प्रश्न सोडवता येईल.
* एकसंघपणे आरक्षणाबाबत भुमिका मांडावी लागेल.
* सरकार आंदोलनात फुट पाडण्याचा प्रयत्न करतय.
* छत्रपती संभाजीराजेंशी चर्चा करणार
* सामुदायिक नेतृत्वाला यश नक्की मिळेल.
* समाजाच्या प्रश्नासाठी कुणाशीही चर्चा करण्यास तयार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -